ZP Interesting Results: सोशल मीडियावर 'हिट', जनतेच्या दरबारात 'फ्लॉप'; कोण आहेत नेत्यांचे 'हे' पराभूत नातेवाईक

अनेक उमेदवारांच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. मात्र प्रत्यक्षात ही चर्चा केवळ सोशल मीडियावरच होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना मतदारांना आकर्षित करता आलेलं नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins

Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये अनेकांना विजय अपेक्षित असताना पराभवाचा सामना करावा लागला. अनेक उमेदवारांच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. मात्र प्रत्यक्षात ही चर्चा केवळ सोशल मीडियावरच होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना मतदारांना आकर्षित करता आलेलं नाही.

नक्की वाचा - शरद पवार ICU मध्ये? डॉक्टर काय म्हणाले; रोहित पवारांची कार्यकर्त्यांना नम्र विनंती

राज्यातील अनेक दिग्गजांचा पराभव...

१ रत्नागिरीत शिवसेना माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव झाला आहे. कोसुंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रमोद अधटराव विजयी झाले आहेत. या ठिकाणी शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती.

२ धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाची लढत असलेल्या तेर गटात सक्षणा सलगरांचा पराभव झाला असून भाजपच्या अर्चना पाटील विजयी झाल्या आहेत. अर्चना पाटील भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी. शरद पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर विरुद्ध अर्चना पाटील यांच्यात लढत होती. अर्चना पाटील यांच्या उमेदवारी बद्दल धाराशिव जिल्ह्यात घराणेशाहीचा आरोप झाला होता. सक्षणा सलगर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

३ पंढरपुरात मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी गटातून कोमल ढोबळे पराभूत झाल्या आहेत. या जागेतून भाजपच्या करुणा शिवशरण विजयी झाल्या आहेत. कोमल ढोबळे या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या आहेत.

Advertisement

४ सोलापूर माळशिरस तालुक्यातील फोडशिरस जिल्हा परिषद गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले आहेत. मात्र पंचायत समितीत त्यांचा पराभव झाला आहे. अर्जुनसिंह हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत

५ राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये शिरूर पंचायत समितीचाही समावेश आहे. कारेगाव गणातून निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. मनीषा पाचंगे यांनी या गणातून विजय मिळवला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा 2700 मतांनी पराभव केला आहे.

Advertisement

६ पंढरपुरातील सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दीपक साळुंखे यांचे पुत्र यशराजे साळुंखे यांचा पराभव झाला आहे. येथून राष्ट्रवादीचे अतुल पवार विजय झाले आहेत.

Advertisement

७ सोलापूर जिल्हा परिषद गटात माळशिरस येथून शरद पवारांचे आमदार उत्तम जानकर यांचा पुत्र जीवन जानकर याचा पराभव झाला. संस्कृती राम सातपुते विजयी ठरला आहे. त्यांनी आपल्या चार महिन्याच्या मुलीसोबत प्रचार केला होता.

८ सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील या दोघांचा ही या निवडणुकीत पराभव झाला आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात मोहोळ तालुक्यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

९ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील फुलंब्री गावचे सरंपच मंगेश साबळे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडून वडोदा बाजार गटातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या साबळे यांचा भाजपचे गोपाल वाघ यांनी ११५० मतांनी पराभव केला.