महायुतीकडून महाविकास आघाडीची हवाई कोंडी! सर्व हेलिकॉप्टर बुक, तासाचं भाडं किती?

सर्वच राजकीय पक्षाचे नेते आता प्रचारासाठी संपुर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. त्यासाठी रस्ते मार्गाचा वापर होतोच. पण प्रचारासाठी नेते मंडळींची पहील पसंती असते ती हेलिकॉप्टची.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रचाराचा आता धुरळा उडणार आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आता प्रचारासाठी संपुर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. त्यासाठी रस्ते मार्गाचा वापर होतोच. पण प्रचारासाठी नेते मंडळींची पहील पसंती असते ती हेलिकॉप्टची. त्यामुळे वेगवान प्रवास तर होतो पण जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचताही येते. हे लक्षात घेता हेलिकॉप्टरची आगाऊ बुकींग केली जाते. त्यात महायुतीने बाजी मारली आहे. राज्यात उपलब्ध असलेली सर्व हेलिकॉप्टर महायुतीने बुक केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची हवाई कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याआधीच महायुतीने महाविकास आघाडीची हवाई कोंडी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण लोकसभेचा निकाल लागताच भाजपने विधानसभेच्या प्रचारासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरकरिता राज्यात उपलब्ध सर्व 25 हेलिकॉप्टर बुक केल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी जे पैसे मोजले आहेत ते पाहून तुमचे ही डोळे फिरू शकता. हेलिकॉप्टरमध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे ट्विन इंजिन आणि दुसरा म्हणजे सिंगल इंजिन. या दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टरचे भाडेही वेगवेगळे आहे. हे भाडे प्रतितास या प्रमाणे आकारले जाते.    

ट्रेंडिंग बातमी - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासात 52 कोटीची मालमत्ता जप्त

ट्विन इंजिन या प्रकारच्या हेलिकॉप्टरला अधिक मागणी असते. या हेलिकॉप्टरमध्ये 2 पायलट असतात. शिवाय इंजिनिअर ही त्यांच्या बरोबर असतात. या हेलिकॉप्टरची आसन क्षमता ही जास्त असते. यात जवळपास 10 ते 12  जण बसून शकतात. या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित आणि जलद प्रवास करता येतो. संकट प्रसंगी हे हेलिकॉप्टर एका इंजिनवरही काम करते. या हेलिकॉप्टरसाठी तासाला साडे चार ते पाच लाख रूपये मोजावे लागतात. 

ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत गणेश नाईंकाचा गेम होणार? गल्ली ते दिल्ली सुत्र फिरली, भाजपला ही फटका?

हेलिकॉप्टरमधला दुसरा प्रकार हा  सिंगल इंजिन हेलिकॉप्टर हा आहे. यात 2 पायलट असतात. त्यांच्या मदतीला इंजिनिअर ही असतो. यात एकूण 4 ते 5 जण बसू शकतात. तुलनेने हे लहान हेलिकॉप्टर असते. हे हेलिकॉप्टर थोड्या कमी वेगात जाते. या हेलिकॉप्टरसाठी तासाला तीन ते साडेतीन लाख रूपये मोजावे लागता. राज्यात जी हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. ती सर्व आता महायुतीने बुक केल्याचे समोर येत आहे. त्यासाठी अडव्हान्स पेमेंटही देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या हवाई वाहतूकीत अडथळा येण्याची शक्ता नाकारता येत नाही. त्यामुळे मविआची हवाई कोंडी झाली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : उमेदवारी यादी जाहीर होताच आज अनेक नाराज नेत्यांचे पक्षप्रवेश

प्रचाराची रणधुमाळी आता उडणार आहे. त्याच वेळी हेलिकॉप्टर बुक झाली आहेत. याची कल्पना महाविकास आघाडाच्या नेत्यांना होती. त्यामुळे त्यांनीही त्यावर उपाय शोधून काढला आहे. मविआच्या नेत्यांना प्रचारासाठी राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातहून हेलिकॉप्टर मागवण्यात आली आहेत. त्यांचे बुकींगही करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन प्रचारात निवडणुकीतील हवाई कोंडी टाळण्यासाठी विरोधकांनीही तयारी केल्याचे आता समोर आले आहे.