जाहिरात
10 minutes ago
मुंबई:

सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपल्या शिलेदारांची यादी जाहीर केली आहे. संधी न मिळाल्याने अनेक नाराज नेते ऐनवेळी पक्षबदल (Political Live Update) करीत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान काल गुरुपुष्यामृताच्या योगानिमित्ताने दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर आजही अनेक नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

Live Update : न्यूझीलँडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला

न्यूझीलँडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला

भारताचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला

न्यूझीलँडकडे 103 धावांची आघाडी

हिंगोलीत गुन्हे शाखेच्या पथकाने 1 कोटी 40 लाख 37 हजार रुपयाची कॅश पकडली

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असून, हिंगोली शहरातील बस स्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1 कोटी 40 लाख 37 हजार रुपयाची कॅश एका खाजगी गाडीमधून पकडली आहे. ही कॅश दोन गाड्यामधून कळमनुरी मार्गे नेली जात होती. दोन्ही खाजगी गाड्या जप्त केल्या असून, रक्कम देखील ताब्यात घेतली आहे. तीन पांढऱ्या पिशव्यांमध्ये ही रक्कम ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलीस आता या रक्कमेचा शोध घेत आहेत, ही रक्कम कुठून आली आणि कुठे नेली जात होती याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

Live Update : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांची महागर्जना...

देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताची निर्मिती सुरू केली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही नवमहाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आहे. हा नवमहाराष्ट्र सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा आहे. मी विरोधकांबद्दल बोलणार नाही, कारण त्यांच्यासाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत. या लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास पळवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी नागपुरच्या न्यायालयात केस केली. त्यामुळे या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील. 

Live Update : तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे शरद पवार यांच्या भेटीला

तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. पंढरपूर विधानसभेतून उमेदवारी मिळावी याकरिता भेटीसाठी दाखल झाले आहेत.

Live Update : थोड्याच वेळात फडणवीस उमेदवारी अर्ज करणार दाखल

Live Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट 

ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या तीन जणांविरुद्ध चालणार फौजदारी खटला दाखल करण्यात आला असून फौजदारी खटला चालवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. डॉ. अजय तावरे , श्रीहरी हळनोर आणि सुहास घटकांबले यांच्या विरोधात हा खटला चालणार आहे. विशेष सरकारी वकिलांनी राज्य शासनाच पत्र न्यायालयात दाखल केलं आहे. 

Live Update : महायुतीच्या जागा वाटपामध्ये आम्हाला डावलले जायेय ही वस्तुस्थिती - रामदास आठवले

महायुतीच्या जागा वाटपामध्ये आम्हाला डावलले जायेय ही वस्तुस्थिती आहे. आमच्यावर अन्याय होतोय, मात्र आपल्याला महायुतीसोबतच राहायचं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. आम्हाला 2-3 जागा तरी मिळाव्यात, एखादी MLC आणि सरकार आल्यानंतर एक - दोन मंत्रिपद आणि महामंडळावर अध्यक्ष मिळावे. कमी जागा मिळाल्या तरी त्याच्या बदल्यात MLC किंवा महामंडळ देण्याबाबत आश्वासन आम्हाला हवे आहे. रिपाई नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत स्पष्ट केली भूमिका घेतली. 

Live Update : निलेश लंकेच्या पत्नी राणी लंकेनां उमेदवारी दिल्यामुळे ठाकरे गटात असंतोष

निलेश लंकेच्या पत्नी राणी लंकेनां उमेदवारी दिल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असंतोष आहे. आघाडीत बिघाडी झाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बंड पुकारलं आहे. 

Live Update : भाजपच्या दोन नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारी जाहीर...

संजयकाका पाटील आणि प्रताप चिखलीकर या भाजप नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्याशिवाय वांद्रे पूर्वेतून उमेदवारी न मिळालेले नाराज असलेले काँग्रेस नेते झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश होताच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

Live Update : अजित पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

अजित पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी

निशिकांत पाटील - इस्लामपूर 

संजयकाका पाटील - तासगाव कवठे महांकाळ

सना मलिक - अणुशक्ती नगर

झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व

सुनिल टिंगरे - वडगाव शेरी

ज्ञानेश्वर माऊली कटके - शिरूर

प्रताप चिखलीकर - लोहा

भाजपच्या दोन खासदारांचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश...

भाजपच्या दोन खासदारांचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश...

Previous Article
नवी मुंबईत गणेश नाईंकाचा गेम होणार? गल्ली ते दिल्ली सुत्र फिरली, भाजपला ही फटका?
Live Update : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांची महागर्जना...
mahayuti-books-all-26-helicopters-election-campaign-mahavikas-aghadi-air-blockade
Next Article
महायुतीकडून महाविकास आघाडीची हवाई कोंडी! सर्व हेलिकॉप्टर बुक, तासाचं भाडं किती?