बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी कडेकोट पहारा ठेवला. मतपेट्या सील करण्यात आल्यात, स्ट्रॅंग रूम बाहेर कार्यकर्ते रात्रभर केंद्राबाहेर तळ ठोकून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साखर कारखान्याच्या निवडणुकीत बारामतीतील राजकीय वातावरण तापले आहे. स्वतः अजित पवार उमेदवार आहेत. विविध गटांमधील चुरस शिगेला पोहोचली आहे. आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या निकालाकडे लागले आहे. कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात रात्रभर जागरण करत पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मतपेट्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका निर्माण होऊ नये.
नक्की वाचा - Malegaon Sahakari Sakhar Karkhana : बारामतीच्या सत्ताकेंद्रासाठी काका-पुतणा राजकीय रिंगणात; कोण मारणार बाजी?
स्थानिक प्रशासनानेही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. पोलिसांचे पथक सतत गस्त घालत आहे. मतमोजणी प्रक्रिया 24 तारखेला सकाळी सुरू होणार असून, निकालाच्या घोषणेनंतर राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.