- मालवण नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
- आमदार निलेश राणे यांचा भाजप उमेदवार शिल्पा खोत यांच्यावर खोट्या जात प्रमाणपत्राचा आरोप.
- शिल्पा खोत यांनी आरोप निलेश राणे यांचे आरोप फेटाळले आहेत.
गुरूप्रसाद दळवी
मालवण नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यात मोठी चुरस आहे. त्यात भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप करत आमदार निलेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. यासाठीचे काही पुरावे ही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. तर हे आरोप निराधार असल्याचा दावा भाजपच्या शिल्पा खोत यांनी केला आहे. त्यामुळे मालवण नगरपरिषद निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
मालवण नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोर जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपच्या मालवण नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतचे पुरावे सादर केले. शिल्पा खोत यांच्या पतीने हे सर्व कांड केला असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. यावेळ राणे यांनी मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर टिका करण्याचे टाळले.
या प्रकरणी शिल्पा खोत यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी असे निलेश राणे म्हणाले. तर भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी आपण समाजसेविका आहे. आपण लोकांच्या कामासाठी नेहमती अग्रेसर असतो. त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे. त्यामुळे विरोधकांना आपला पराभव समोर दिसत असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते अशा प्रकारे आरोप करत आहेत असं त्या म्हणाल्या. मतदानासाठी चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याच वेळी आमदार निलेश राणे यांनी केलेली वक्तव्य ही चुकीची असल्याचे शिल्पा खोत यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा - Tata Sierra: टाटा सिएराची धमाकेदार एन्ट्री! किंमत, फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल,'आहा!,
या आरोप प्रत्यारोपाने मालवण नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर त्यांच्या समोर त्यांचेच बंधू आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या दोन्ही भावांची लढत म्हणून याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आपलाच वचक असावा यासाठी या दोन्ही भावांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे. शिवाय या दोघांनाही आपल्या नेतृत्वगुणाची चुणूक दाखवण्याची ही संधी मिळाल्याची ही चर्चा या निमित्ताने होत आहे.