मतदाराने कुऱ्हाडीने फोडलं EVM, नांदेडमधील मतदान केंद्रात प्रचंड गोंधळ

भानुदास एडके असं ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नांदेड:

महाराष्ट्रात मतदानादरम्यान एक अनुचित घटना घडली आहे. एका मतदाराने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर हा गंभीर प्रकार घडला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

भानुदास एडके असं ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. भानुदास मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात आला होता. मात्र मतदान केंद्रात प्रवेश करताच त्याने VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने फोडण्यास सुरुवात केली. मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी लगेचच भानुदास याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

(नक्की वाचा : सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप )

संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे भानुदास ओरडत होता. मतदान केंद्रावर सुरक्षा कर्मचारी तैनात होते. पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Topics mentioned in this article