विशाल पुजारी, कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये मतदानाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मतदान करण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तरेश्वर पेठ येथील एका मतदान केंद्राजवळ ही घटना घडली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदानासाठी निघालेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा अचानक चक्कर आल्याने मृत्यू झाला. महादेव श्रीपती सुतार ( वय 69 वर्ष) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. महादेव हे उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदानासाठी निघाले होते.
( नक्की वाचा : निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचं सांगत काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं )
महादेव हे सकाळी साडेदहाच्या सुमारास मतदानासाठी येत असताना मतदान केंद्रासमोर त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
( नक्की वाचा : निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचं सांगत काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं )
दुपारी 1 वाजेपर्यंत कुठे किती मतदान?
- लातूर - 32.71 टक्के
- सांगली - 29.65 टक्के
- बारामती - 27.55 टक्के
- हातकणंगले - 36.17 टक्के
- कोल्हापूर - 38.42 टक्के
- माढा - 26.61 टक्के
- उस्मानाबाद - 30.54 टक्के
- रायगड - 31.34 टक्के
- रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 33.91 टक्के
- सातारा - 32.78 टक्के
- सोलापूर - 29.32 टक्के