जरांगेंनी पत्ते खोलले, हिशोब होणार! 'तू देत नाही तर तुला पाडल्या शिवाय सोडत नाही'

पण आता वेळ आली आहे. या सरकारची वाट लावणार आहे. आरक्षण तू देत नाही पण तुला पाडल्या शिवाय सोडत नाही.असा इशाराही शेवटी जरांगे यांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार त्यांनी संकेत दिले आहेत. गोरगरीब मराठ्यांचे सुख सरकारला पाहावलं नाही. त्यांच्या आनंदात विष कालवण्याचं काम सरकारनं केलं आहे. आरक्षणाचा हाता तोंडाशी आलेला घास सरकारने हिरावला आहे. त्यामुळे असा लोकांना आता सुट्टी नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत लोकसभे प्रमाणेत सरकार विरोधात उभे ठाकणार आहेत याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरक्षणाचा घास आमच्या हाता तोडांशी आला होता. पण या सरकारने आमचा हात ही तोडला आणि घासही हिरावला असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ज्यांनी मराठ्यांना आनंद हिरावला आहे त्यांना सुट्टी नाही असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. आमच्या सुखात विष कालवण्याचा अधिकार या सरकारला नाही. देवेंद्र फडणवीसांनी तर आमच्या नाकावर टिच्चून आमच्या माना पिळगटल्या आहेत. जाता जात त्यांनी ओबीसीमध्ये काही जातींचा समावेश केला. ते केवळ मराठ्यांना खुन्नस दाखवण्यासाठीच असाही थेट आरोप त्यांनी फडणवीसांवर केला. 

ट्रेंडिंग बातमी - लढणार की पाडणार? जरांगेंचं ठरलं? मोठ्या निर्णयाच्या तयारीत मराठा समाज

त्यामुळे या सरकारची आता वाट लावण्याची वेळ आली आहे. त्यांचे फक्त सत्तेवर लक्ष आहे. पण आणचं आमच्या भविष्यावर लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस हा क्रुर माणूस आहे. त्यांनी राजकारण केले. फोडाफोडी केली. पण त्यांचा पाडाव मराठेच करणार असाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या सरकारचा हिशोब होणार. मराठे बदला घेणार. समाजाला दुखावलं गेल. कोणतही कारण नसताना समाजाला टार्गेट केलं गेलं. फक्त मराठा समाजाला खुन्नस दाखवली गेली.

ट्रेंडिंग बातमी - नाद करायचा नाय! पवार मुंडेंना दाखवून देणार, करेक्ट कार्यक्रमासाठी करेक्ट उमेदवार?

पण आता वेळ आली आहे. या सरकारची वाट लावणार आहे. आरक्षण तू देत नाही पण तुला पाडल्या शिवाय सोडत नाही.असा इशाराही शेवटी जरांगे यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून जरांगे यांची सरकार विरोधातच भूमीका असणार याचे संकेत मिळत आहे. दरम्यान समाजाच्या बैठकीनंतर अधिकृत भूमीका काय असणार हे ही जरांगे आजच जाहीर करणार आहेत. मात्र मराठा समाजाचा राग हा फडणवीसांवर असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे निवडणुकीत समाज भाजपचा विरोध करणार का? या प्रश्नाचं उत्तर जरांगे देणार आहेत.