'...तर चपलेचा हार गळ्यात घालू' ओबीसी विरूद्ध मराठा वाद पेटणार?

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलचा हार घालण्यात आला आहे. शिवाय गाडीवर काळी शाही ही फेकण्यात आली आहे. सांगलीच्या एका हॉटेल समोर त्यांची गाडी उभी होती. त्यावेळी अज्ञातानी ही कृती केली आहे. शिवाय गाडीवर एक मजकूराचे पत्रकही टाकण्यात आले होते. त्यामुळे सांगलीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा विरूद्ध ओबीसी वाद पेटणार की काय अशी भिती निर्माण झाली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

धमकीमध्ये कसला उल्लेख 

शेंडगेच्या गाडीच्या काळी शाही आणि चपलांचा हार घालण्यात आला होता. त्या पेक्षा गंभीर बाबमध्ये त्यांच्या गाडीच्या काचेवर लिहीण्यात आलेला मजकूर आहे. त्या मजकूरात 'प्रकाश शेंडगे  तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. भुजबळाने जशी नाशिक मध्ये माघार घेतली. तशी तू माघार घे आणि मराठ्यांच्या नादी लागू नको, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेला हार गळ्यात घालू. एक मराठा लाख मराठा.' असे पत्रक थेट गाडीच्या काचेवर चिकटवले आहे. शेंडगे यांनी या प्रकाराचा आणि प्रवृत्तीचा निषेध केला आहे.

हेही वाचा -  'डॉ.पाटील आणि राणा यांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है'

'इथं मतं मागू नका' 

कवठेमहाकाळ गावात शेंडगे गेले असता त्यांना विरोध झाला. हे संपुर्ण गाव मराठा समाजाचे आहे असे त्यांना सांगितले गेले. शिवाय शेंडगेंचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे त्यांनी मते मागू नये असे सांगण्यात आले. यावर शेंडगे यांनी मराठा आरक्षणाला आपला विरोध नसल्याचे सांगितले. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळावे अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी सांगतले. मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद पेटवण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. शिवाय याबाबत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

भूजबळांनी दिले सडेतोड उत्तर 

प्रकाश शेंडगे यांच्या बरोबर झालेला हा प्रकार चुकीचा आहे. शिवाय आपल्या बद्दलही वक्तव्य करण्यात आले ते पुर्ण चुकीचे आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. मी निवडणुकीच्या रिंगणातून कोणाच्या भितीने माघार घेतलेली नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असेही भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. मराठा ओबीसी हा नाहक वाद घातला जात असल्याचेही ते म्हणाले.   

Advertisement