KDMC Mayor : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज गुरुवारी मंत्रालयात ऐतिहासिक सोडत काढली जात आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे राज्यातील 29 शहरांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील 29 महापालिकांच्या पहिल्या अडीच वर्षातीलच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित केलं जात आहे.
यावेळी २९ पैकी एकाच महानगरपालिकेत एसटी प्रवर्गातील महापौर असेल. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचं नाव समोर आलं आहे. येथे एसटी जातीचा महापौर असेल.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कसं असेल चित्र?
शिवसेना शिंदे गट - किरण भांगले ( एसटी नगरसेवक)
शिवसेना शिंदे गट - हर्षाली थविल (महिला)
मनसे - शितल मंडारी
भाजपकडे एकही नगरसेवक नाही