लोकसभेच्या रिंगणात कुठे नणंद विरुद्ध भावजय, तर कुठे भावजय विरुद्ध दिर अशा लढती पाहायला मिळाल्या. पण दिंडोरी लोकसभा मतदार संघात खासदार असलेली भावजय आणि आमदार असलेल्या दिराचे मनोमिलन झाले आहे. होय महायुतीच्या लोकसभेच्या भाजप उमेदवार भारती पवार यांनी आपले दिर नितीन पवार यांची भेट घेतली. या दोघांमधील वैर सर्वांनाच माहित आहे. मात्र या गोष्टी मागे ठेवत भारती पवार यांनी नितीन पवार यांची भेट घेत सर्वच वादांवर पडदा टाकला आहे. नितीन पवार यांनीही आपण भारती पवार यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर घरातल्या थोरांनीही अशीच एकी कायम राहू दे अशी भावना या भेटी वेळी व्यक्त केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारती पवार नितीन पवार भेट
दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार या कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या भावजय आहेत. मात्र या दोघांमध्ये वाद होता. त्यामुळे कुटुंब एक असलं तरी त्याचे मतभेद होते. भारती पवार या भाजपच्या तर नितीन पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे. ते सध्या अजित पवारां बरोबर आहेत. अजित पवार हे महायुतीत आहेत. त्यामुळे महायुती म्हणून नितीन पवार यांना भावजयीचा प्रचार करणे क्रमप्राप्त होते. पण या दोघांमधील वादामुळे ते काय करणार हा खरा प्रश्न होता. यासर्व गोष्टी लक्षात घेता भारती पवार यांनी थेट दिराचं घर गाठलं. त्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्या भाऊक झाल्या होत्या. बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेट आहोत. आमच्यात काही गैरसमज होते. मतभेद होते पण मनभेद नव्हते. नितीन पवार हे माझा पेक्षा मोठे आहेत. त्यांनी मला आशिर्वाद दिला आहे. अशा वेळी दिवंगत ए.टी पवार यांची आठवण येते असं भारती पवार म्हणाल्या.
हेही वाचा - भुजबळ -कांदे वाट पेटला, दोघेही भिडले, दिंडोरीत महायुतीत घमासान
आमदार नितीन पवार काय म्हणाले?
भारती पवार यांचा प्रचार आपण करणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले. तसा प्रचाराला आपण सुरूवात केली आहे असेही ते म्हणाले. ही बैठक नियोनाची होती. आम्ही एकत्रीत काम करणार आहोत. शिवाय कळवण मतदार संघातून अधिकचे मताधिक्य देण्यावर आमचा भर असेल असेही त्यांनी याभेटीनंतर स्पष्ट केले. तर त्यांच्या आईने ही या भेटीमुळे अतिशय आनंद झाला आहे असे सांगितले. शिवाय ही ऐकी कायम राहो असं ही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झालेला आहात? उद्धव ठाकरेंचं उत्तर काय?
भारती पवारांना फायदा होणार?
दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपने भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीच्या त्या उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना मैदानात उतरवले आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्यापैकी एक नितीन पवार हेही आहेत. त्यामुळे भारती पवार यांचे भवितव्य हे राष्ट्रवादीच्या आमदारांवर आहे. त्यात नितीन पवार यांनी भारती पवार यांना पाठिंबा दिल्याने भारती यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. त्याचा त्यांना फायदाही होईल असे बोलले जात आहे.