जाहिरात
This Article is From May 09, 2024

भुजबळ -कांदे वाट पेटला, दोघेही भिडले, दिंडोरीत महायुतीत घमासान

भुजबळ -कांदे वाट पेटला, दोघेही भिडले, दिंडोरीत महायुतीत घमासान
नाशिक:

महायुतीमध्ये सर्वच काही अलबेल आहे असे नाही. त्याचे खणखणीत उदाहरण दिंडोरी लोकसभा मतदार संघात पाहायला मिळत आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे एकमेकांना चांगलेच भिडले आहे. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार राहीला बाजूला, त्या ऐवजी हे दोघे एकमेकांचा हिशोब चुकता करण्याच्या मागे लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मात्र दिंडोरीच्या महायुतीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांचे टेन्शन वाढले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुहास कांदेंचा भुजबळांवर मोठा आरोप 

सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे. एकमेकावर टिका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. सुहास कांदे यांचा नांदगाव मतदार संघ हा दिंडोरी लोकसभा मतदार संघा येतो. याच नांदगाव मधून पंकज भुजबळ यांना हरवू सुहास कांदे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. पण महायुती झाल्यामुळे आता त्यांना एकत्र काम करण्या शिवाय पर्याय नाही. असं असलं तरी हे दोन्ही नेते त्याला अपवाद आहेत. सुहास कांदे यांनी तर जाहीर मेळाव्यात छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भुजबळांना मंत्रीपद घ्यायचं असेल तर ते महायुतीकडून घ्यायचं. आणि काम करायचं असेल तर ते तुतारीचं करायचं असा थेट आरोप त्यांनी केला आहे.  तुम्हाला ऐवढाच तुतारीचा पुळका असेल तर आपण आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि तुतारीचं काम करा असं आव्हानही त्यांनी दिले आहे. आम्ही महायुतीचे उन्हातान्हातून काम करत आहे. पण त्याचे क्रेडीट आपल्याला मिळू नये यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. 

हेही वाचा - 'आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झालेला आहात? उद्धव ठाकरेंचं उत्तर काय?

कांदेंवर भुजबळांचा पलटवार 

कांदेंच्या या आरोपाला छगन भुजबळांनीही लगेचच प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. सुहास कांदेंना गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. एकीकडे कांद्यामुळे महायुतीच्या उमेदवार भारती पवार प्रॉब्लेममध्ये आहेत आहेत तर दुसरीकडे कांदेंचा प्रॉब्लेम आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्या आमच्यातला वाद काय आहे हे विधानसभेला पाहू. आता आपल्यामुळे भारती ताईंनी अडचण नको असेही भुजबळांनी स्पष्ट केले. दरम्यान पंधरा ते वीस दिवसा पूर्वीच आपण भारती पवारांचे काम सुरू केल्याचं भुजबळांनी स्पष्ट केले. आपण कमळ चिन्हावर मतदान करायचं आहे हे सांगत आहोत असेही ते म्हणाले. आपले कार्यकर्ते येवला आणि नांदगाव या दोन्ही मतदार संघात सक्रीय झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

हेही वाचा - 'मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर...' अजित पवार जाहीर पणे बोलले

दिंडोरी लोकसभेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी 

दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपने भारती पवार यांनी उमेदवारी दिली आहे. महायुतीच्या त्या उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना मैदानात उतरवले आहे. तसे पाहात राष्ट्र्वादी काँग्रेसची या मतदार संघात चांगली ताकद आहे. राष्ट्रवादीचे चार आमदार या मतदार संघात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचा एक आणि भाजपचा एक आमदार आहे. त्यामुळे भारती पवार यांची सारी मदार या मतदार संघात भुजबळ आणि कांदे यांच्यावरच आहे. मात्र त्यांच्यातलाच वाद सध्या टोकाला गेल्याने भारती पवारांचे टेन्शन वाढले आहे.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com