महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवसेनेच्या उमेदवारांसाठी ठाण्यात प्रचारसभा घेणार आहे. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे मतदारसंघातील उमेदवार नरेश मस्के यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याआधी राज ठाकरे ठाण्यातील आनंदमठाला भेट देणार आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्यातील आनंद मठात म्हणजेच आनंद दिघे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आनंद मठाच्या अंगणात छोटा स्टेज बांधण्यात आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून राज ठाकरे प्रथमच आनंद मठात येत असल्याने आमच्या सगळ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असल्याची भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना व्यक्त केल्या.
(वाचा - अधिकृत विरुद्ध बंडखोर! जळगावमध्ये भाजप समोर बंडखोर भाजप उमेदवाराचेच आव्हान)
राज ठाकरे यांची खारेगाव येथे सभा होणार आहे. जवळपास 40 ते 50 हजार खुर्च्यांची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. राज ठाकरे येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहियला मिळत आहे.
( नक्की वाचा- PM नरेंद्र मोदी निवृत्त होणार? अरविंद केजरीवालांनी असं वक्तव्य करुन काय साधलं?)
मनसे आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी म्हटलं की, 18 वर्षानंतर राज ठाकरे हे धनुष्यबाण आणि शिवसेना या पक्षाच्या स्टेजवर उभे राहणार आहेत. आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की राज ठाकरे यांना प्रत्यक्ष त्या स्टेजवर बघायला कधी मिळेल. आम्ही दरवर्षी राज ठाकरे यांच्या सभा बघत असतो. परंतु अनेक शिवसैनिक असे आहेत त्यांना राज साहेबांचे भाषण त्यांच्या स्टेजवर ऐकण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण होईल, असं राजू पाटील यांनी म्हटलं.