Mumbai Mayor News: मुंबईच्या महापौरपदाबाबत भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या वर्षांनंतर मुंबई महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळालंय. एकूण 89 जागांवर भाजपचे नगरसेवक जिंकून आले आहेत. 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार आणि शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 'NDTV'ला दिलीय.
मुंबई महानगरपालिका भाजप-शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या
- भाजप - 89
- शिंदे शिवसेना - 29
(नक्की वाचा: Mumbai Mayor News: मुंबईत महापौर कोणाचा होणार? अमित साटम यांनी एका ओळीत संपवला विषय)
ठाणे, केडीएमसीमध्ये काय होणार?
दुसरीकडे ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना हा पक्ष मोठा ठरलाय. ठाण्यामध्ये 75 जागांवर शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक तर भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत 122 जागा असून शिवसेनेचे 53 नगरसेवक तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्येही भाजप आणि शिवसेनेत महापालिकेवरील वर्चस्वासाठी अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या दोन महापालिकांसाठी शिवसेनेने मुंबईत भाजपवर दबाव वाढवण्यास सुरूवात केल्याचे म्हटलं जातंय.
पीडीएफ फाइल पूर्ण पाहण्यासाठी X चिन्हावर क्लिक करा
मुंबईत महायुतीचाच महापौर विराजमान होईल : अमित साटमएकीकडे मुंबईमध्ये भाजपापच महापौर होणार असल्याची माहिती समोर येतेय तर दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय की, "महायुतीचे 118 नगरसेवक जिंकून आले आहेत. त्यामुळे महायुतीचाच महापौर विराजमान होईल. मुंबईचा महापौर शिवसेनेचा का भाजपचा होईल हे महत्त्वाचे नाही. मुंबईला भ्रष्टाचारविरहीत प्रशासन देणे महत्त्वाचे आहे.कोणत्याही एका पक्षाला महापौर पद मिळणं इतकी ही छोटी निवडणूक नव्हती. ही मुंबईच्या पिढ्यांचं भविष्याचं रक्षण करणारी निवडणूक होती. आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेला आहोत आणि आमचे 118 नगरसेवक निवडून आलेले आहेत".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

