Municipal Elections Expences : महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून आणि पक्षांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. अनेक मुद्दे चर्चेत आणले जात आहेत. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची नवी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी अ, ब, क, ड या श्रेणीनुसार आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे खर्च करताना उमेदवारांकडे करडी नजर असणार आहे. प्रचारावरील खर्चावर निवडणूक आयोगाची विशेष सायबर टीम लक्ष ठेवून असणार आहे.
कोणत्या महापालिका निवडणुकीत किती खर्चाची मर्यादा?
अ वर्ग
मुंबई, पुणे आणि नागपूर
१५ लाख
ब वर्ग
पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे
१३ लाख
क वर्ग
कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छ. संभाजीनगर, वसई-विरार
११ लाख
ड वर्ग
उर्वरित १९ महानगरपालिका
९ लाख
कुठे खर्च करता येणार?
प्रचार सभा, मंडप, ध्वनीक्षेपक खर्च
सोशल मीडियावरील जाहिराती
पेड न्यूज
पत्रके
पोस्टर्स
बॅनर छपाई
कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च, वाहन खर्च
खर्च केलेला हिशोब सादर करावा लागणार?
उमेदवारांना निवडणुकीचा निकाल लागल्यापासून पुढील ३० दिवसांच्या आत खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक असेल. अतिरिक्त खर्च आढळल्यास उमेदवाराला सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवलं जाऊ शकतं.