मविआचं ठरलं! जागा वाटपावर एकमत झालं, सांगलीबाबत मोठी घोषणा होणार?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाविकास आघाडीत काही जांगावरून वाद होता. तो शेवटपर्यंत सुटू शकला नाही. अखेर दिल्ली दरबारी अशा जागांवर निर्णय झाल्याचं समजत आहे. या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद गुढीपाडव्याला होत आहे. यापत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील.    

सांगलीचा तिढा सुटणार? 
सांगली लोकसभेवरून काँग्रेस आण शिवसेनेत वाद होता. या जागेवर उद्धव ठाकरे यांनी याआधीच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. ही जागा काँग्रेसच लढेल अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. त्यामुळे या जागेचा निर्णय दिल्ली दरबारी झाला आहे. याबाबतचीही घोषणा गुढीपाढव्याला होणाऱ्या दाट शक्यता आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसचे विशाल पाटील लढणार की शिवसेनेचे चंद्रहार पाटील लढणार हेही स्पष्ट होणार आहे. 

कोणाच्या वाट्याला किती जागा? 
लोकसभेच्या 48 जागांपैकी कोणाच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा याचं गणितही मंगळवारी स्पष्ट होईल. ज्या जागांवर वाद नव्हता, अशा जागांवरचे उमेदवार काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं आधीच जाहीर केले आहेत. मात्र वाद असणाऱ्या जागांबाबत मविआच्या पत्रकार परिषदेतून काय समोर येतं याकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे.       

संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा 
मविआचं जागावाटपावर एकमत झाल्याचं सुत्रांकडून समजत आहे. त्याची अधिकृत घोषणा गुढीपाढव्याच्या मुहुर्तावर केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संबोधीत करतील. त्यानंतर प्रताराची रणनिती, संयुक्त जाहीर सभांचीही घोषणा याच पत्रकार परिषदेतून केली जाण्याची शक्यता आहे.   

Advertisement

वंचितचं काय होणार? 
वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये समावून घेतलं जाणार का? त्यांची समजूत काढली जाणार का? याबाबत मविआचे नेते काय बोलतात याकडेही सर्वाचं लक्ष असणार आहे. वंचितसाठी आघाडीत चार जागा सोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी धुडकावून लावला होता. त्यांनी अनेक जागांवर आता आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.