Nanded News :'मुस्लीम उमेदवार नको, फक्त हिंदूंचंच पॅनल बनवू'; अशोक चव्हाणांची कथित Audio Clip Viral, ऐका...

Nanded Municipal Corporation Election 2026 : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Nanded Municipal Corporation Election 2026 :  या नव्या प्रकरणामुळे अशोक चव्हाणांच्या अडचणीत भर पडू शकते.
नांदेड:

योगेश लाटकर, प्रतिनिधी

Nanded Municipal Corporation Election 2026 :  नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी वाटपावरून पक्षात आधीच नाराजी नाट्य सुरू असताना आता या नवीन प्रकरणामुळे चव्हाणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

काय आहे प्रकरण?

नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 म्हणजेच इतवारा मदीनानगर प्रभागात निवडणूक पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा प्रभाग प्रामुख्याने मुस्लिमबहुल लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. व्हायरल झालेल्या ऑडिओनुसार, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या मदतीने अशोक चव्हाण यांनी एका इच्छुक उमेदवाराशी मोबाईलवर संवाद साधला. 

या संवादादरम्यान इच्छुक उमेदवाराने या प्रभागात किमान एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट द्यावे, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र, आपल्याला मुस्लिम उमेदवार नको आहे, आपण केवळ हिंदूंचेच एक पॅनल तयार करू, असे चव्हाण आणि सावंत यांनी सांगितल्याचे या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. अर्थात ही ऑडिओ क्लिप व्हायरल असून त्याची 'NDTV मराठी' कोणतीही पृष्टी करत नाही. 

( नक्की वाचा : BMC Election 2026 : राजकीय चमत्कार! किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात ठाकरेंनी उमेदवारच दिला नाही; काय आहे कारण? )

खर्चाची जबाबदारी पक्षावर

या चर्चेदरम्यान इच्छुक उमेदवाराने असेही स्पष्ट केले की, आपण उमेदवार सुचवू शकतो, पण निवडणूक लढवण्यासाठी लागणारा खर्च करण्याची कुवत कोणाकडेही नाही. यावर बोलताना चव्हाण आणि सावंत यांनी खर्चाची काळजी करू नका, संपूर्ण आर्थिक बाजू पक्ष सांभाळेल, तुम्ही फक्त योग्य नावांची यादी द्या, असे आश्वासन दिल्याचे समोर आले आहे. 

Advertisement

या प्रभागात अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गातून उमेदवार उभे करायचे होते. मात्र, भाजपला या प्रभागात अद्याप सक्षम उमेदवार मिळला नाही.

चिखलीकर आणि चव्हाण यांच्यात वाक्युद्ध

दुसरीकडे, अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील जुने राजकीय वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. सध्या अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत, तर चिखलीकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सक्रिय आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत चिखलीकरांच्या आव्हानाबाबत पत्रकारांनी विचारले असता, 

Advertisement

मी चिखलीकर नावाच्या कोणा व्यक्तीला ओळखतच नाही, असे रोखठोक उत्तर अशोक चव्हाण यांनी दिले. चव्हाणांच्या या वक्तव्यावे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )

'साठीबुद्धी नाठी' अशी जहरी टीका

अशोक चव्हाणांच्या विधानावर चिखलीकर यांनीही अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाणांनी आपल्याला ओळखण्यास नकार दिल्याने संतापलेल्या चिखलीकर यांनी, साठी बुद्धी नाठी असते, अशा शब्दांत चव्हाणांवर निशाणा साधला. वय वाढल्यामुळे कदाचित त्यांची विचार करण्याची क्षमता कमी झाली असावी, असा टोला त्यांनी लगावला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन दिग्गज नेत्यांमधील हे वाक्युद्ध आता कोणत्या थराला जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

भाजपावर तिकीट विक्रीचा आरोप

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलले जात असल्याची चर्चाही जोरात सुरू आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना 50 50 लाख रुपये घेऊन उमेदवारी दिली जात असल्याचा गंभीर आरोप काही जुन्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.

अशोक चव्हाण यांची कथित Audio Clip
 

Topics mentioned in this article