Modi Cabinet : नरेंद्र मोदींसोबत आज कोणते नेते घेणार शपथ? नावांची यादी आली समोर

PM Modi Oath Ceremony: जीतनराम मांझी, जयंत चौधरी आणि अनुप्रिया पटेल यांना दिल्लीतून बोलावणं आलं आहे. राज्यातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी वर्णी लागणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक नेते देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळपासूनच देशभरातील अनेक नेत्यांना फोन गेले आहेत. सध्या मंत्रिपदासाठी काही नावे समोर आली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, जीतनराम मांझी, जयंत चौधरी आणि अनुप्रिया पटेल यांना दिल्लीतून बोलावणं आलं आहे. राज्यातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. 

(वाचा - मोदींच्या मंत्रिमंडळातील 'वजनदार' मंत्री नितीन गडकरी, तिसऱ्यांदा घेणार शपथ)

कोणते नेते आज मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात? 

भाजप

  • अमित शाह
  • नितीन गडकरी
  • राजनाथ सिंह
  • अश्विनी वैष्णव
  • नित्यानंद राय
  • मनसुख मांडविया
  • प्रल्हाद जोशी
  • शिवराज सिंह चौहान
  • बीएल वर्मा
  • शोभा करंदलाजे
  • ज्योतिरादित्य सिंधिया
  • सर्बानंद सोनोवाल
  • अर्जुन राम मेघवाल
  • रक्षा खडसे
  • जितेंद्र सिंह
  • किरेन रिजीजु
  • राव इंद्रजीत सिंह
  • शंतनु ठाकुर
  • बंदी संजय
  • जी किशन रेड्डी
  • हरदीप सिंह पुरी
  • रवनीत सिंह बिट्टू
  • अन्नपूर्णा देवी
  • जितीन प्रसाद
  • मनोहर लाल खट्टर
  • हर्ष मल्होत्रा
  • अजय टम्टा
  • धर्मेंद्र प्रधान
  • निर्मला सीतारामण
  • सावित्री ठाकूर
  • मुरलीधर मोहोळ
  • सी आर पाटील
  • श्रीपद नाईक
  • गजेंद्र सिंह शेखावत
  • गिरीराज सिंह
  • कृष्णपाल गुर्जर
  • एस जयशंकर
  • पीयूष गोयल

(वाचा- मोदी 3.0 : आई-वडीलही निष्ठावंत, 35 वर्षे भाजपसोबत; पीयुष गोयल घेणार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ  )

टीडीपी

  • राम मोहन नायडू
  • चंद्रशेखर पेम्मासानी

जेडीयू

  • एचडी कुमारस्वामी 
  • रामनाथ ठाकूर

रिपाइं

  • रामदास अठवले

एलजेपी

  • चिराग पासवान

हम पार्टी

  • जीतनराम मांझी

शिवसेना

  • प्रतापराव जाधव

आरएलडी

  • जयंत चौधरी

अपना दल

  • अनुप्रिया पटेल

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने आपल्या घटक पक्षांना सध्या दबाव न टाकण्याचं आवाहन केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या मागण्यांवर लक्ष दिलं जाईल. यावर सहमतीनंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे ठरवलं जाईल. सूत्रांच्या माहतीनुसार, चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूला एक-एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक-एक राज्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं.   

Topics mentioned in this article