Breaking
News

नरेंद्र मोदी 8 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार?

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसून येत आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असं भाजप नेत्यांकडून सांगितलं जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख देखील समोर येत आहे. 

नरेंद्र मोदी येत्या 8 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. 7 जून रोजी एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांचा बैठक होणार आहे. त्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेता म्हणून निवड केली जाऊ शकते.

(वाचा -  'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला)

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भूमिका निर्णायक

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचं असेल तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भूमिका निर्मायक असणार आहे. कारण एकट्या भाजपकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत नाही. भाजपकडे 240 खासदार आहेत. तर एनडीएचं संख्याबळ 293 आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी भाजपची भिस्त आपल्या सहकारी पक्षांवर असणार आहे.   

(वाचा - Lok Sabha Election 2024 Live Update : 'पिक्चर अभी बाकी है'! दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, सत्तेसाठी रस्सीखेच सुरू)

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे (JDU) 12 खासदार निवडून आले आहेत. तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीचे (TDS) 16 खासदार निवडून आले आहे. त्यामुळे एनडीए सरकार बनलं तर त्याचे किंगमेकर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हेच असतील. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.  

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Topics mentioned in this article