गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला लोकसभेचा निकाल अखेर समोर आला आहे. येथे भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपला 240, काँग्रेस 99, समाजवादी पार्टी 37, तृणमूल काँग्रेस 29, डीएके 22, तेलुगू देसम 16, जनता दल 12, शिवसेना 9, शरद पवार गट 8, शिंदे गट 7 जागा मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीएला 293 आणि इंडिया आघाडीला 229 जागा मिळाल्या आहेत. प्रथमदर्शनी पुन्हा एनडीएचं सरकार येणार असल्याचं दिसत असलं, तरी यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीकडून चंद्रबाबू नायडू, नितीशकुमार यांची मदत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
महाराष्ट्राच्या निकालाबद्दल सांगायचं झालं तर निवडणूक आयोगाकडून आलेल्या निकालानुसार, काँग्रेस 13, भाजप 9, उद्धव ठाकरे गट 9, शरद पवार गट 8, शिंदे गट 7, अजित पवार गट 1 आणि अपक्ष 1 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडी 31 जागांवर विजय मिळवून मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे महायुती केवळ 17 जागा टिकवू शकली आहे. महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना दिलं समर्थन पत्र
एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना दिलं समर्थन पत्र
एनडीएच्या सर्व नेत्यांनी विजयाबद्दल नरेंद्र मोदींचं केलं अभिनंदन
देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली भाजपच्या पराभवाची कारणं...
देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली भाजपच्या पराभवाची कारणं...
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे महाविकास आघाडीला 30 जागा तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानालं लागलं. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय त्यांनी भाजपच्या अपयशाची कारणंही सांगितली.
राज्यातील अनेक मतदारसंघात सत्ताविरोधी म्हणजेच अँटी इनक्मबन्सी असल्यामुळे उमेदवारांना फटका बसला. याशिवाय राज्यात अनेक भागात कांदा प्रश्न हा मुद्दा होता. सोयाबीन आणि या दोघांचे भाव कोसळले याचा फटका शेतकऱ्यांना बसला. आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही. याशिवाय देशभरात संविधान बदलाचा मुद्दा चर्चिला गेला. मराठा आरक्षणाचा मुद्दाही यासाठी कारणीभूत ठरला. राज्यात तयार झालेल्या नरेटिव्हला प्रभावीपणे उत्तर देऊ शकलो नाही.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? भाजपचा पराभव मान्य करीत म्हणाले...
8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी?
8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी?
8 जून रोजी एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ होण्याची शक्यता आहे. 7 जून रोजी संसदीय पक्षांची बैठक होईल. ज्यात पंतप्रधान मोदी संसदीय दलाचे नेता म्हणून निवडून येऊ शकतात.
मोदींच्या कॅबिनेटची बैठक, दुसरीकडे चंद्राबाबूंनी ठेवल्या दोन अटी - सूत्र
मोदींच्या कॅबिनेटची बैठक, दुसरीकडे चंद्राबाबूंनी ठेवल्या दोन अटी - सूत्र
वडील विजयी झाल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
काल लोकसभेचा निकाल लागला आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे 48 हजार मतांनी निवडून आले आहेत. हक्काचा खासदार जनतेने निवडून दिलाय. 10 वर्षे निष्क्रिय असलेल्या विनायक राऊत यांना बदलण्याचा निर्णय जनतेने घेतला होता. सर्वांचं मनापासून आभार मानतो - आमदार नितेश राणे
सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू, शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले...
अद्याप चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क केलेला नाही. आज सायंकाळी आमची बैठक आहे. यावेळी निर्णय घेतला जाईल - शरद पवार
नितीश कुमार आणि तेजस्वी यादवांचा दिल्लीच्या दिशेने प्रवास एकत्र, चर्चेला उधाण
नितीश कुमार आणि तेजस्वी यादवांचा दिल्लीच्या दिशेने प्रवास एकत्र, चर्चेला उधाण
शरद पवांरासह सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना
#WATCH | Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar and party MP from Baramati, Supriya Sule leaves from Mumbai for Delhi for the INDIA bloc meeting, scheduled for later today.
— ANI (@ANI) June 5, 2024
NCP-SCP won 8 Lok Sabha seats in Maharashtra and Supriya Sule retained Baramati by a margin of 1,58,333… pic.twitter.com/oNClFFQBqj
धाराशिवमध्ये एमआयएम, वंचितचं डिपॉझिट जप्त
धाराशिवमध्ये एमआयएमच्या उमेदवाराला अवघी 2060 मतं पडली तर वंचितच्या उमेदवाराला 33402 मतं पडली. मुस्लिमांनी एमआयएमकडे पाठ फिरवल्याने विजयाचा दावा करणाऱ्या एमआयएमलां अवघी दोन हजार मतं पडली आहेत. विशेष म्हणजे एमआयएमने धाराशिवमध्ये जोरदार प्रचार केला होता. ओमराजे निंबाळकर तीन लाखापेक्षा जास्त मतांनी विजय झाल्याने एमआयएम, वंचित यांचं डिपॉझिट जप्त झालं आहेत.
बैठकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विजयी उमेदवार नारायण राणे दिल्लीला रवाना
NDA च्या बैठकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विजयी उमेदवार नारायण राणे दिल्लीला रवाना
#WATCH | Union Minister and BJP MP from Ratnagiri- Sindhudurg (Maharashtra), Narayan Rane arrives in Delhi ahead of the NDA meeting scheduled for later today.
— ANI (@ANI) June 5, 2024
He says, "We don't know the details of the meeting. We have been called here so we have come...Credit for the victory… pic.twitter.com/FDJm7lP6Yv
शरद पवारांनी खेळली खेळी, आज घडणार मोठी घडामोड
आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्याआधी शरद पवार हे आंध्र प्रदेश चंद्राबाबू नायडू , बिहारचे नितेश कुमार यांच्या संपर्कात आहे अशी माहिती मिळते. शरद पवार इंडिया आघाडीत नायडू आणि नितेश कुमार यांना जोडू पाहत आहेत. यासाठी संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. आज याबाबत दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडतील.