Nashik News : नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; एबी फॉर्मच्या वाहनाचा पाठलाग, इच्छुक उमेदवार नाराज 

नाशिकमध्ये भाजपमध्ये जोरदार नाराजीनाट्य पाहायला मिळालं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik News : छत्रपती संभाजीनगरनंतर नाशिकमध्येही एबी फॉर्मवरुन राडा झाल्याचं समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक निष्ठावंताना डावलून आयाराम-गयारामांना एबी फॉर्म दिल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर नाशिकमध्येही भाजपमध्ये जोरदार नाराजीनाट्य पाहायला मिळालं.  

नाशिकमधील भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. एबी फॉर्म मिळेल अशी अनेकांना आशा आहे, मात्र त्यांना डावललं जाण्याची भीतीही आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ आहे. त्यापूर्वी पक्षाकडून याची घोषणा होणं अपेक्षित आहे. दरम्यान नाशिकमध्ये भाजपमध्ये जोरदार नाराजीनाट्य पाहायला मिळालं. एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना इच्छुकांनी घेरल्याचं समोर आलंय. आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या वाहनांचा पाठलाग केला जात आहे. मुंबई नाशिक महामार्गावर हा थरार रंगला आहे. 

नक्की वाचा - Sambhajinagar Election: भाजपकडून आयारामांना तिकीट, निष्ठावंतांचा आक्रोश! मंत्री मागच्या दाराने पळाले

नाशिकमध्ये कुणाकुणाला मिळालं एबी फॉर्म? 

भाजपकडून आतापर्यंत नाशिक पश्चिम विभागात नेतृत्व करत असलेले मुकेश शहाणे, बाळकृष्ण शिरसाठ, योगिता हिरे, किरण गामने, पुष्पा आव्हाड, भगवान दोंदे, पुष्पा पाटील-गामने, कावेरी घुगे- भाजप, ज्योती कवर - भाजप, प्रियांका राकेश दोंदे-भाजप, रामदास दातिर- भाजप यांना आतापर्यंत भाजपकडून AB फॉर्म चे वाटप करण्यात आले आहेत. AB फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला.  नाशिकमध्ये भाजपाकडून AB फॉर्म वाटप सुरू आहे. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. कोणाचा होणार पत्ता कट आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी मिळेल,  याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


 

Topics mentioned in this article