राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादी बरोबरच अजित पवार कुठून निवडणूक लढणार? छगन भुजबळ मैदानात असणार की नाही? त्याच बरोबर नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तर पहिल्या यादीतून मिळाली आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.दुसरी यादी लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिल्या यादीत जास्तीत जास्त विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार मतदार संघ बदलणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अजित पवार हे बारामती विधानसभा मतदार संघातूनच निवडणूक लढणार आहेत. तर छगन भुजबळ यांना येवला मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच बरोबर दिलीप वळसे पाटील हे अंबेगाव मतदार संघातून निवडणूक लढतील. आदिती तटकरे यांनाही श्रीवर्धन मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे हे परळीतून मैदानात असतील.
ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
पहिल्या यादीत काही नावे वगळण्यात आली आहेत. नवाब मलिक यांना उमेदवारी देणार की नाही याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. पहिल्या यादीत नवाब मलिक यांचा समावेश नाही. तर त्यांची मुलही सना खान हिचाही समावेश नाही. त्यामुळे या पिता पुत्रांना दुसऱ्या यादीची वाट पाहावी लागणार आहे. शिवाय झिशान सिद्दीकी यांची ही उमदेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तर काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुलभा खोडके यांना अमरावतीतून तर हिरामण खोसकर यांना इगतपूरी मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी
अजित पवार - बारामती
छगन भुजबळ - येवला
दिलीप वळसे पाटील - आंबेगाव
हसन मुश्रीफ - कागल
धनंजय मुंडे - परळी
नरहरी झिरवाळ - दिंडोरी
धर्मराव बाबा आत्राम - अहेरी
आदिती तटकरे - श्रीवर्धन
अनिल पाटील - अंमळनेर
संजय बनसोडे - उद् गीर
रामकुमार बडोले - अर्जुनी मोरगाव
प्रकाश सोळंके - माजलगाव
मकरंद पाटील - वाई
माणिकराव कोकाटे - सिन्नर
दिलीप मोहिते - खेळ आळंदी
संग्राम जगताप - अहमदनगर शहर
दत्तात्रय भरणे - इंदापूर
बाबासाहेब पाटील - अहमदपूर
दौलत दरोडा - शहापूर
अण्णा बनसोडे - पिंपरी
नितीन पवार - कळवण
आशुतोष काळे - कोपरगाव
किरण लहामटे - अकोले
चंद्रकांत उर्फ राजू नवघरे - बसमत
शेखर निकम - चिपळूण
सुनील शेळके - मावळ
अतुल बेनके - जुन्नर
यशवंत माने - मोहोळ
चेतन तुपे - हडपसर
सरोज आहिरे - देवळाली
राजेश पाटील - चंदगड
हिरामण खोसकर - इगतपुरी
राजू कारेमोरे - तुमसर
इंद्रनील नाईक - पुसद
सुलभा खोकडे - अमरावती शहर
भरत गावित - नवापूर
निर्मला विटेकर - पाथरी
नजीब मुल्ला - मुंब्रा-कळवा