सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मध्ये घडलेल्या नाट्यावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या दिवशी नक्की काय झालं? कशामुळे झालं? त्या मागे कोण होतं? शेवटच्या क्षणाला राजेंनी असा निर्णय का घेतला? या सर्व प्रश्नाची उत्तरे सतेज पाटील यांनी थेट दिली आहेत. NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मोठे खुलासे केले आहेत. शिवाय आता त्या मतदार संघात निकाल काय लागेल यावरही त्यांनी भाष्य केले आहे. या संपूर्ण घटनेचा कोल्हापूरच्या राजकारणावर काय परिणाम होईल याचा ही खुलासा या मुलाखतीत सतेज पाटील यांनी केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून मधूरिमा राजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज ही दाखल केला होता. तर काँग्रेसच्याच राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आश्चर्यकारक पणे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधूरिमा राजे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न
राजकारणात काही गोष्टी आपल्याकडून होत असतात. त्या मागे पुढे कधीना कधी होतात. प्रत्येकाला आपले मत आहे. या मतदार संघात काही गोष्टी होत्या. असे असतानाही उमेदवारी बदलून मधूरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तरीही त्यांनी ही उमेदवारी मागे घेतली. हा आपल्यासाठी मोठा धक्का होता. यामुळे आपण भावनाविवश झालो होतो. त्यावेळी जे काही मी व्यक्त झालो तो ती त्यावेळची प्रतिक्रीया होती. पण त्यातून आता मी पुढे गेलो आहे. मी सावरलो आहे. असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर जनतेने मला सावरलं. जनता माझ्या बरोबर आहे. काँग्रेस बरोबर आहे. खासदार शाहू महाराजही आपल्या बरोबर असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - BJP Action : भाजपने 40 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी; काय आहे कारण?
एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होवू नये ही शाहू महाराजांची भूमिका होती. त्यामुळेच त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यांच्या घरात कोणताही कौटुंबिक वाद नाही. त्यांच्या कुटुंबाला मी फार जवळून ओळखतो. त्यांनी एका कार्यकर्त्याचा विचार केला. त्यातूनच उमेदवारी मागे घेतली गेली. मात्र आता भाजपकडून नरेटीव्ह सेट केले जात आहे. दोन्ही बाजूना बदनाम करण्याचा डाव खेळला जात आहे असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?
कोल्हापूरची जनता सर्व काही ओळखून आहे. ती काँग्रेसच्या मागे आहे. मुख्यमंत्री या मतदार संघात ठाण मांडून होते. पण त्यांना 23 तारखेला समजेल की कोल्हापुरच्या जनतेने त्यांच्या पाठीला माती लावली आहे. या घटनेचा काही परिणाम कोल्हापुरच्या राजकारणावर होणार नाही. जिल्ह्यातल्या 10 पैकी 10 जागा या महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि मविआला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता गेल्या अडीच वर्षात ज्या काही गोष्टी झाल्यात त्या विसरलेले नाहीत. जी फोडाफोडी राज्यात झाली त्याच्या विरोधात जनता कौल देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.