जाहिरात

लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न

लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न
जत, सांगली:

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगली जिल्ह्यातील जतमध्ये प्रचारसभा झाली. जतमध्ये गोपीचंद पडाळकर भाजपाचे उमेदवार आहेत. या प्रचारसभेत त्यांनी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यासाठी सरकारनं केलेल्या योजनांचा उल्लेख केला. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी संविधानाच्या नावानं लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले फडणवीस?

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती. त्या यात्रेचा संदर्भत देत फडणवीस यांनी त्यांना लक्ष्य केलं. 'राहुल गांधी ज्या प्रकारची मोट बांधतायत ती महाराष्ट्रासाठी घातक आहे. भारत जोडोमध्ये दीडशे दोनशे संघटना आहेत, यापैकी 100 पैकी जास्त अरकाजतावादी संघटना आहेत. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्या समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या संघटना आहेत हे स्पष्ट होतं. हे भारत जोडो आंदोलन नाही नाही. तर भारत तोडो आंदोलन आहे. 

तुम्ही संविधनाच्या नावानं लाल पुस्तक का दाखताय? लाल पुस्तकच तुमच्या हातामध्ये का आहे? कुणाला तुम्ही लाल पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देत आहात. आपल्या समाजाची वीण उद्धवस्त करण्याचं षडयंत्र राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्ष करतोय, असा आरोप फडणवीस यांनी केला.

'चला मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु', देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज

( नक्की वाचा : 'चला मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु', देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज )

दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न झाला नाही

जत हा राज्यातील शेवटचा मतदारसंघ नाही.  हा माझ्यासाठी पहिला मतदारसंघ आहे. हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहेच. पण, माझा गोपीचंद इथून लढतो. तुमचा आशीर्वाद गोपीचंदला मिळाला तर पुढच्या पाच वर्षात पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ जत करुन दाखवीन, अशी घोषणा त्यांनी केली.

आमची लढाई दुष्काळाची आहे. महाराष्ट्रात वर्षानुवर्ष दुष्काळाचं राजकारण करणारे लोकं आपण पाहिले. जतमध्ये पाणी पोहचलं तर माझ्या कारखान्याला पाणी पोहचणार नाही, असं काँग्रेसचे नेते म्हणाले होते. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील काही भाग जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवण्यात आला. मुठभर प्रस्थापितांनी या भागाचा दुष्काळ दूर करण्यासाठीच कधीच प्रयत्न केला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि नंतर पाटबंधारे मंत्री असताना जत आणि अन्य दुष्काळी भागातील लोकांसाठी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. तुमच्या पिढीनं दुष्काळ पाहिला असेल, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. दुष्काळाला भूतकाळ करण्याची ताकद आम्ही तयार केली आहे. 

उद्धव ठाकरे चालतात, भाजपा का नाही? कोल्हापूरच्या सभेत आठवलेंचा शरद पवारांना सवाल

( नक्की वाचा : उद्धव ठाकरे चालतात, भाजपा का नाही? कोल्हापूरच्या सभेत आठवलेंचा शरद पवारांना सवाल )

दुष्काळी तालुका, दुष्काळी गाव ही ओळख पुसून टाकणार.  युती सरकारच्या काळात 1995 ते 99 योजना सुरु केल्या. त्यानंतर 2014 पर्यंत योजना कुलुपबंद होत्या. त्या मी पुन्हा सुरु केल्या. गोपीचंद पडाळकर यांनी जतसाठी MIDC मंजूर केली, उद्योगधंदे देण्याचं काम माझं आहे. माझ्या गोपिचंदला विधानसभेत पाठवा. उद्योगाचं पत्र देऊनच जतला परत पाठवतो, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: