पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अमेठी नाहीतर रायबरेली येथून निवडणूक लढणार आहेत. यावरुन पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवायला घाबरले आहेत, त्यामुळेच त्यांनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं. पश्चिम बंगालच्या वर्धमान येथील एका प्रचारसभेत ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांच्याआधी सोनिया गांधीदेखील राजस्थानमध्ये गेल्या. सध्या काँग्रेसची जी अवस्था आहे, त्यावरुन स्पष्ट होतंय की यावेळीही त्यांना कमी जागा मिळतील, अशा शब्दात मोदींनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर हल्लाबोल केला.
(नक्की वाचा- 'ऐनवेळी मला तिकीट नाकारलं हे माझ्यासाठी...'; भाजप खासदार राजेंद्र गावितांचं मोठं विधान)
भाजपचं एक्स अकाऊंटवरील ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटलं की, शहजादे वायनाडमधून पराभवाच्या भीतीने दुसऱ्या जागेचा शोध घेत आहेत. आता त्यांना अमेठीतून पळ काढून रायबरेलीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी आणि विरोधक लोकांना देशभर फिरून बोलतात की घाबरु नका. पण आता मी त्यांना बोलतोय की, घाबरू नका आणि पळू नका.
(नक्की वाचा - राणेंसाठी अमित शहा मैदानात, कोकणात ठाकरे बंधुंच्या सभांचाही तडका)
के एल शर्मा यांचा स्मृती इराणींना आव्हान
अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तर रायबरेलीतून प्रियांका गांधी असतील असेही म्हटले जात होते. पण हे सर्व अंदाज चुकवत काँग्रेसने सर्वांना चकीत केले आहे. त्यात के. एल. शर्मा यांना अमेठीतून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे.
किशोरीलाल शर्मा असे आहे. गांधी घराण्याचे अंत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. ते मुळचे पंजाबच्या लुधियानाचे आहेत. 1983 साली ते पहिल्यांदा राजीव गांधी यांच्या बरोबर अमेठी आणि रायबरेलीत आले होते. त्यानंतर ते गांधी घराण्याचे खास झाले. राजीव गांधींच्या हत्येनंतर तर ते गांधी घराण्याच्या आणखी जवळ आहेल. शिवाय त्यांनी अमेठी आणि रायबरेलीत आपला जम बसवला.
एकेकाळी अमेठीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे के. एल. शर्मा आता स्वत: साठी या मतदार संघात लढणार आहेत. इतकी वर्ष या भागात काम केल्याचे त्यांना सर्व बारकावे माहित आहेत. ही शर्मा यांची जमेची बाजू आहे.