पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' दिले 'हे' कारण

पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना जोरदार झटका दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाशिम:

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान म्हणून पोहरादेवीकडे पाहीले जाते.या पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना जोरदार झटका दिला आहे. त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय  आपल्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांचा हा राजीनामा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी आपण शिवसेना का सोडत आहोत याचे कारणही आपल्या राजीनामा पत्रातून दिले आहे. महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात नक्की काय लिहीले आहे त्यावर एक नजर टाकूयात.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मा.श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्ष प्रमुख

सस्नेह जय महाराष्ट्र ! आपण शिवसेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रीय स्तरावर आघाडीचे प्रमुख नेते म्हणुन कार्य करत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम महंत या नात्याने आशीर्वाद सोबतच एक शिवसैनिक म्हणुन हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा. आपण कोरोना काळातील अतिसंवेदनशील परिस्थितीत केलेली उल्लेखनीय कामगिरीची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. ही बाब सर्व भारतीय आणि खास करुन महाराष्ट्रातील जनतेसाठी गौरवाची आहे. त्याच बरोबर आपण शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले प्रेम आणि न्याय नात्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेने आपल्याला कुटूंब प्रमुखाची उपमा दिली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

शिवसेना पक्ष बळकट व्हावा म्हणुन मी महंत या नात्याने आपणास आशीवार्द दिले. सोबतच पक्षाला माझ्या परिने मदत व्हावी म्हणुन माझी प्रमाणिक जबाबदारी जाणुन मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन पक्ष वाढीसाठी संघटन स्तरावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या एक वर्षापासुन संघटन स्तरावर काम करण्यासाठी आपल्याकडुन आदेश आणि सुचनाची वाट पाहत आहे. आपण 9 जुलै 2023 ला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे दर्शनाकरीता आले होते.  फेब्रुवारी 2024 ला जनसंवाद यात्रे निमित्त कारंजा व वाशिम येथे आले होते. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : शिंदे गटाच्या उमेदवार यादीतून दिसतेय घराणेशाही? या सहा नेत्यांच्या नातेवाईकांना संधी   

ती भेट सोडुन आतापर्यंत आपली दहा मिनीटाची भेट घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु आपल्याकडुन दहा मिनीट भेटीसाठी वेळ दिली जात नाहीत. त्याबद्दल थोड शल्य वाटत आहे. कादाचित आपल्या व्यस्त कार्यामुळे आपण वेळ देणे शक्य होत नसेल. हे सुध्दा मला मान्य आहेत. मी मागील दहा महिन्यापासुन मातोश्री वर भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात आणि मा. श्री रवि म्हात्रे साहेबांना संपर्क करत आहे. भेटीसाठी आपणास सुध्दा काही मॅसेजेस केले होते, तरी सुध्दा दखल घेतली जात नाही. 

ट्रेंडिंग बातमी - वारे वा निवडणूक ! 2 दिवसात 4 पक्षात प्रवेश करणारा उपसरपंच, त्यांनी असं का केलं?

माझ्या कडुन पक्षात काही नविन कार्यकर्त्यांना प्रवेशची यादी दिली होती. त्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशासाठी मला निमंत्रण सुध्दा देण्यात आले नाही. साहेब मला पक्षाचे कार्य करायचे आहे. पक्षाने मला तिकीट दिले पाहिजे हा माझा पुर्ण आणि अंतिम उद्देश किंवा मानस नाही. पक्ष प्रमुख या नात्याने आपल्याला काही कटू निर्णय घ्यावे लागतात, हे मी समजु शकतो. परंतु संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यापासुन भेटीची वेळ मिळत नसेल, तर या वरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असे सिध्द होते. म्हणुन मी अतिशय जड अंतः करणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करीत आहे.

जय महाराष्ट्र !

आपला स्नेही 
सुनील महाराज