वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची अँजिओग्राफी केली जाणार आहे. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्बेतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी ही अपडेट दिली आहे. ही अपडेट देताना त्यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहनही केले आहे. त्याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक सुजात यांनी जारी केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुजात आंबेडकरांनी एक पत्रका द्वारे मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. त्यांनी सांगितले आहे की प्रकाश आंबेडकरांबरोबर खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे. सपोर्टीग स्टाफ आहे. जो त्यांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा. ते सोडू नका. आम्ही सर्व प्रकाश आंबेडकरांच्या सोबत आहोत, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
बुधवारी रात्री प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखत होते. त्यांना अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते असे सुजात यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची अँजीओग्राफी करण्यात येणार आहे. त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील उपचार डॉक्टर करणार आहेत. याबाबतची माहिती वेळोवेळी दिली जाईल असेही ते म्हणाले आहेत. आम्ही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलो आहोत. जसा रिपोर्ट येईल तशी माहिती सर्वांना कळवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - 'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा असे आवाहन सुजात यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.