जाहिरात

'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं

मान कापली तरी आता माघार घेणार नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुपडा साप करणार म्हणजे करणार, आता सोडत नाही असा थेट इशारा सरकारला दिला आहे.

'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
जालना:

मराठा, मुस्लिम आणि दलित आता एकत्र आहे आहेत. हे धर्म परिवर्तनासाठी नाही तर सत्ता परिवर्तनासाठी एकत्र आले आहेत. आता सहनशक्ती संपली आता परिवर्तन होणार. मान कापली तरी आता माघार घेणार नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुपडा साप करणार म्हणजे करणार, आता सोडत नाही असा थेट इशारा सरकारला दिला आहे. सर्व धर्मगुरूंची बैठक अंतरवली सराटी इथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर जरांगे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आपला भाजप विरोधक कायम दाखवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष केले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मला राजकारणात कधीही पडायचे नव्हते. पण राजकारणात यावं लागत आहे. राजकारण कसं करायचं हे आता देवेंद्र तात्यांनी मला शिवकवलं आहे. त्यांनी फडणवीसांचा उल्लेख तात्या असा केला. मला राजकारणाच्या वाटेवर नेवू नका असे सांगितले होते. तसे केल्यास मी तुमचा पचका करेन असेही सांगितले होते. पण त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं. आता सुपडा साफ करणार म्हणजे करणार. कोणालाही सोडणार नाही असा इशाराच जरांगे यांनी या निमित्ताने दिला. आता मान कापली तरी माघार घेणार नाही असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. मात्र कोणत्या आणि किती मतदार संघात निवडणूक लढायची याचा निर्णय तीन तारखेला घेतला जाईल असेही ते म्हणाले. शिवाय उमेदवार कोण असतील हे ही तीन तारखेला अंतिम केले जाणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले जाईल त्यांनी ती तात्काळ मागे घ्यायची आहे. ज्यांनी समाजाला हिणवलं. समाजाला त्रास दिला. त्यांना कोणत्याही स्थितीत सहकार्य करणार नाही असे सांगत त्यांना भाजपकडे बोट दाखवले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - माहीममध्ये नवा ट्विस्ट, बाळासाहेबांचं नाव घेऊन सदा सरवणकरांची राज ठाकरेंना साद

लोकशाही मार्गाने आम्ही ही निवडणूक लढू. कोणी कोणाला यात धमकावू नये. मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याने आमचे उमेदवार पडणारच नाहीत असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. परिवर्तन अटळ आहे असेही ते म्हणाले. 75 वर्षात कधी पाहीली नसेल अशी लाट आता येणार आहे असेही ते म्हणाले.  गरिबाची लेकरं निवडणुकीला उभी राहणार आहेत. त्यांना कोणी रोखू नका असेही ते म्हणाले. ही लढाई अन्याया विरोधातली लढाई आहे. दरम्यान आणखी काही धर्मगुरू आपल्याला भेटणार आहेत. त्यांनाही बरोबर घेणार असल्याचे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - प्रचारावेळी हृदयविकाराचा झटका, ठाकरेंच्या उमेदवारा बरोबर काय झालं?

जरांगे यांनी सुफडा साफ करण्याचा इशारा दिला आहे. मात्र तीन तारखेपर्यंत सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे. सुफडा साफ करणार पण तो नक्की कोणाचा होणार हे तीन तारखेला स्पष्ट होईल. जरांगे तीन तारखेला किती उमेदवार रिंगणात ठेवतात. कोणा विरूद्ध रिंगणात ठेवता. कोणाला पाठिंबा देतात यावरही या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यांनी भाजपला विरोध दर्शवला असला तरी त्यांनी सरकारमधील शिवसेना शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विरोध दर्शवलेला नाही. त्याच बरोबर त्यांनी मविआलाही समर्थन दिलेले नाही. त्यामुळे 3 नोव्हेंबरला जरांगे काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.