विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनं जोरदार प्रचार चालवला आहे. शिवाय आघाडी आणि युतीने आमचेच सरकार येणार असा दावा ही केला आहे. त्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार याची ही चर्चा आता जोर धरू लागली आहे. आघाडी बरोबरच युतीनेही मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलेले नाही. त्यात आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय मुख्यमंत्री कोणाचा होणार हेच सांगितलं आहे. त्याच बरोबर आपणही भावी मुख्यमंत्री आहात का? या प्रश्नालाही त्यांनी दिलखुलास पणे उत्तर दिले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीकडून ते रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे अतूल भोसले रिंगणात आहेत. या मतदार संघात पैशाचा पुर आला आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कराड दक्षिणमध्ये ट्रकने पैसा आणला जात आहे. त्याला रसद ही महाराष्ट्राचे गृहमंत्री पुरवत आहेत असा थेट आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले
आपल्याला पराभूत करण्यासाठी पैशाचा वापर होत आहे. थेट नागपूरवरून पैसे कराडमध्ये आणले जात आहेत. तसेच अनेकांना नोकरीचं आमिष दाखवलं जात आहे असं चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी एनडीटीव्ही मराठीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे आरोप केले आहे. असं असलं तरी कराड दक्षिणची जनता आपल्या मागेच उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय मागिल विधानसभा निवडणुकीतही असचं झालं होतं. त्यावेळीही इथली जनता काँग्रेसच्या मागे उभी राहीली असं ते म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीच सत्तेत येईल असा विश्वासही व्यक्त केला.
ट्रेंडिंग बातमी - राज ठाकरे आले, फक्त 2 मिनिटं बोलले अन् माघारी फिरले; कारण काय?
महाराष्ट्रात साधारण 170 ते 175 जागा महाविकास आघाडीच्या येतील असा दावाही त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीत जो घटक पक्ष सर्वात जास्त जागा मिळवेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असंही त्यांनी स्पष्ट केले. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ते स्पष्ट पण म्हणाले. या आधी शरद पवारांनीही ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे वक्तव्य केले होते. दरम्यान आपण मुख्यमंत्री होणार का? यावर आताच बोलणे योग्य नाही. त्याला आता काही अर्थ नाही. जोपर्यंत 23 तारखेचा निकाल येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री पदाबाबत बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले.