शरद पवारांनी कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार टीका करत त्यांना झोपडून काढलं. ज्यांना सर्व काही दिलं. शक्ती दिली. आमदार केलं. पुढे मंत्री केलं. त्यांनीच ज्या वेळी गरज होती त्याच वेळी दगा दिला. शिवाय वर तोंड करून निर्लज्ज पणे सांगतात पवार साहेबांना सांगून गेले. म्हणजे आधी झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं. अशा लोकांना धडा शिकवायचा आहे. अशा लोकांना शंभर टक्के पाडलं म्हणजे पाडलं पाहीजे. असा आग्रहच मी धरतो असं म्हणत पवारांनी मुश्रीफांवर हल्लाहबोल केला. कागलमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून समरजित घाटगे मैदानात आहेत. त्यांच्या प्रचाराला पवार आले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कागलमध्ये अनेक जण चांगले नेते होते. मात्र त्यावेळी हसन मुश्रीफांना संधी देण्यात आली होती. त्यांना संधी देताना कधी त्यांची जात धर्म पाहीला नाही. संधी दिल्यानंतर ते आमदार झाले. पुढे त्यांना मंत्रीही केले. पण ज्या वेळी त्यांची गरज होती त्यावेळी त्यांनी दगा दिला. काही लोकांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुश्रीफही होते. ते मला येवून भेटले होते. जर भाजप बरोबर गेलो नाही तर आत जाईन असं ते सांगत होते. त्यावर आत म्हणजे कुठे असं त्यांना विचारलं होतं. त्यावर जेलमध्ये जाईन असं त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. त्यांच्याच घरातल्या महिला त्यानंतर असाच अन्याय आमच्यावर होणार असेल तर आम्हाला गोळ्या घाला असं म्हणत होत्या याची आठवण पवारांनी यावेळी करून दिली.
ट्रेंडिंग बातमी - 'चला आपण एकत्र येवू', भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साद, नेमकं काय घडलं?
जे जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्यावर ईडीच्या केसेस सुरू आहेत. ते त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या फाईल बाजूला ठेवल्या आहेत.त्या अजूनही बंद केल्या नाहीत. पण त्या फाईल एकना एक दिवस पुन्हा उघडू शकतात असा इशाराही यावेळी शरद पवारांनी दिला. त्यांना त्यांच्या केसची चिंता आहे. पण या केस बंद झालेल्या नाहीत हे ही त्यांनी लक्षात ठेवावे असंही ते म्हणाले. अशा लोकांना अद्दल घडवणे गरजेचे आहे. त्यामुळेच या निवडणुकीत यांना धडा शिकवा असे आवाहन पवारांनी यावेळी केले. या लोकांना शंभर टक्के पाडलं पाहीजे, पाडलं पाहीजे, पाडलं पाहीजे असं पवार म्हणाले. हसन मुश्रीफांना पाडा असा आग्रहच त्यांनी या सभेत धरला.
ट्रेंडिंग बातमी - भिवंडीत समीकरण बदलणार? कपिल पाटलांनी सुत्र फिरवली, शिंदेंचा फायदा होणार?
भाजपबरोबर जाण्या आधी ही सर्व मंडळी आपल्याला भेटली होती. त्यांनी आपण वेगळा विचार करू, तुम्ही ही आमच्या बरोबर चला असे सांगितले. मी त्यांना विचारलं होतं कोणा बरोबर जायचं आहे. त्यांनी सांगितलं भाजप बरोबर जायचं आहे. त्यावर आपण कोणाच्या विरोधात लढलो, कोणाच्या विरोधात मतं मागितली. ते म्हणाले भाजप. मग भाजप बरोबर कसं जायचं. ते आपल्याला पटत नाही. त्यासाठी मी तुम्हाला आशिर्वाद देवू शकत नाही असं ही ते म्हणाले. भुजबळांनीही आपण सहा महिने जेलमध्ये राहून आलो आहोत. आपल्याला परत आत जायचं नाही असं सांगितलं होतं असं पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा, भिजतच ठोकलं भाषण
ज्यांचे हात बरबटले आहेत. जे भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यांना ईडीची चिंता आहे. मला त्याची अजिबात चिंता नाही. मलाही ईडीची नोटीस आली होती. त्यावेळी ती नोटीस राज्य सरकारी बँकेतील गैरव्यवहारा बाबत होती. ज्या बँकेचा मी सदस्य नाही. त्या बँकेशी काही संबध नाही. कर्ज घेतलं नाही. कोणाला जामीनही नाही. अशा वेळी ही नोटीस का याची माहिती घेतली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल मीच येतो चौकशीला. तिथून ईडीच्या ऑफीस जाण्यासाठी निघालो. पण तिथेच पोलिस आयुक्त आणि ईडीचे अधिकारी आले होते. तुम्ही येवू नका. आमच्याकडून चुकून नोटीस गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपल्याला कधीच नोटीस पाठवली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world