- रेवती हिंगवे आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आंदेकर कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे
- आंदेकर कुटुंबातील लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी
- बंडू आंदेकर याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत
रेवती हिंगवे
आयुष कोमकर हत्या प्रकरणात जेलची हवा खाणाऱ्या आंदेकर कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारीच्या पायघड्या टाकल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आंदेकर कुटुंबातील दोन जणांना एबी फॉर्म दिली आहे. त्यामुळे त्या एबी फॉर्मवर कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता आहे. त्याला कारण ही तसेच आहे. आंदेकर कुटुंबातील मात्र आता जेलची हवा खाणाऱ्या लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी निवडणूक लढवायची आहे. त्यातील लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तर बंडू आंदेकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या दोघींनीही आपल्या वकीला मार्फत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आंदेकर कुटुंबाने प्रभाग क्रमाक 23 मधून उेदवारी मिळाली यासाठी राष्ट्रवादीकडे विनंती केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज ही घेतले होते. त्यांना जेलमधून निवडणूक लढण्यास कोर्टाने परवानगी ही दिली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर या दोघींनी अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांनी पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर बंडू आंदेकरला मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली नाही. बंडू अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
प्रभाग क्रमांक 23 मध्ये चार उमेदवार असणार आहेत. त्यातील तीन उमेदवार हे आंदेकर कुटुंबातील आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर एक जण हा अपक्ष असणार आहे. ज्या ठिकाणी आंदेकर कुटुंबिय निवडणूक लढवत आहेत तो त्यांचा गड मानला जातो. ते जरी जेलमध्ये असले तरी त्यांची टोळी या निमित्ताने कार्यरत होईल. त्यांचा प्रचारात त्यांचेच लोक दिसतील. राष्ट्रवादीची कुमक ही यावेळी आंदेकरांसोबत असेल. या आधी ही आंदेकर कुटुंबातील लोकांनी पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आहे. त्यांच्या कुटुंबाने पुण्याचे महापौरपद ही भूषवलं आहे.
आंदेकर कुटुंबीय निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शिवाय त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. अशा वेळी आयुष कोमकरची आई काय भूमीका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुषच्या आईने आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी देवू नये अशी मागणी केली होती. शिवाय दुसऱ्याच दिवशी त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून ही आंदेकरां विरोधात उमेदवारी मागितली होती. त्यामुळे त्या ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे झाल्यास आंदेकर विरूद्ध कोमकर असा सामना वार्ड 23 मध्या पाहायला मिळेल.