जाहिरात

PCMC Election 2026: अजित पवार महापालिकेची निवडणूक लढणार! वॉर्ड ठरला, अर्ज भरला; प्रकरण काय?

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रभाग २५ मधील उमेदवार अजित पवार यांचे नाव सारखेच असल्याने, सोशल मीडियावर अजित पवार पिंपरी-चिंचवडची निवडणूक लढणार अशा चर्चेला उधाण आले आहे.

PCMC Election 2026: अजित पवार महापालिकेची निवडणूक लढणार! वॉर्ड ठरला, अर्ज भरला; प्रकरण काय?

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pimpri Chinchwad Municiple Corporation Election 2026:  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चक्क 'अजित पवार' निवडणूक लढवणार असल्याचे समोर आल्याने सुरुवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, हे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री नसून, प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढवणारे अजित पोपट पवार हे उमेदवार आहेत.

अजित पवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात..

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पोपट पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ (ड) मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय समीकरणे पाहता ) 'घड्याळ' या चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. जर त्यांना पक्षाचा अधिकृत 'एबी फॉर्म' मिळाला, तर ते या प्रभागातील अधिकृत उमेदवार असतील.

BJP Candidate List: मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 102 उमेदवारांना एबी फॉर्म; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

नावामुळे होतेय चर्चा...! 

राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असले, तरी स्थानिक पातळीवर नावातील साधर्म्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि कुतूहल निर्माण झाले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रभाग २५ मधील उमेदवार अजित पवार यांचे नाव सारखेच असल्याने, सोशल मीडियावर अजित पवार पिंपरी-चिंचवडची निवडणूक लढणार अशा चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, नावातील या साधर्म्याचा फायदा कोणाला होणार आणि निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात अजित पवार नावाचा हा करिश्मा काय जादू दाखवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Pune News: बैठका, चर्चा, वाटाघाटी सगळं व्यर्थ; पुण्यात शिवसेना-भाजप युती अखेर तुटली; काय आहेत कारणे?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com