रायबरेली की वायनाड मतदार संघ सोडणार? राहुल गांधी थेट बोलले

राहुल गांधी वायनाड मतदार संघ आपल्या जवळ ठेवणार की रायबरेली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राहुल गांधी यांना काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोनही लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे. त्यांनी दोन्ही मतदार संघातून जरी विजय मिळवला असला तरी त्यांना एका मतदार संघाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी वायनाड मतदार संघ आपल्या जवळ ठेवणार की रायबरेली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राहुल गांधी यांना काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी थेट उत्तर दिले आहे. 

हेही वाचा - वडिलांच्या अपयशाची लेकीकडून परतफेड, पक्षाचा बालेकिल्ला परत मिळवला

राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल 3 लाख 64 हजाराचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला आहे. त्यांनी सीपीआयच्या अन्नी राजा आणि भाजपच्या के. सुदर्शन यांचा पराभव केला आहे. तर उत्तर प्रदेशातल्या रायबरेली लोकसभा मतदार संघातूनही त्यांनी भाजपच्या दिनेश सिंह यांचाही जवळपास तीन लाखाच्या फरकाने पराभव केला आहे. राहुल गांधी हे एकाच वेळी दोन मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता एका मतदार संघाचा राजीनामा द्यावा लागणा आहे. 

हेही वाचा -  तिकिटासाठी लढल्या, पतीपेक्षाही जास्त मतं; 6 वेळा आमदार अन् पालकमंत्री असलेल्या नेत्याला केलं चितपट

याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. दोन्ही मतदार संघातून निवडून दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी मतदारांचे आभार मानले आहे. दोन ठिकाणी जिंकल्यावर एका ठिकाणचा राजीनामा द्यावा लागेल हे आपल्याला माहित आहे. मात्र रायबरेली की वायनाड इथला राजीनामा द्यायचा याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. याबाबत पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.   

Advertisement