'जातीय जनगणना होणारच, आरक्षणाची 50% ची मर्यादाही वाढवणार'

संविधानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मनातील नाही तर जनतेच्या मनातील संवेदना मांडल्या आहेत. तो गरीबांचा आवाज आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

देशातील 90 टक्के लोकांना कोणत्याही प्रकारची ताकद दिली जात नाही. ना त्यांच्याकडे ताकद आहे ना त्यांच्याकडे संपत्ती आहे. अशा स्थितीत जातीय जनगणना होणे गरजेचे आहे. जातीय जनगणना झाल्यास देशातील प्रत्येक जातीला आपण कुठे आहोत? आपल्या हातात किती शक्ती आहे? किती संपत्ती आहे? देशात आमची काय भूमीका आहे? या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळेच जातीय जनगणना होणारच अशी ग्वाही काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. शिवाय आरक्षणाची असलेली 50% ची मर्यादा वाढवणार असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेले हे वक्तव्य महत्वाचे समजले जाते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने संविधान सन्मान संमेलनाचे नागपूरात आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जातीय जनगणना देशातील जनतेला हवी आहे. जातीय जनगणना म्हणजे न्याय असे आपल्याला वाटते असंही राहुल यावेळी म्हणाले. सध्या देशातल्या 90 टक्के लोकांकडे कोणती ही शक्ती नाही. त्याला काही अर्थ नाही. विना पावर, विना संपत्तीचे जर आपण कोणाला सन्मान देणार असू तर त्याला काय अर्थ आहे. जो भूका आहे. त्याला झोपण्यासाठी घर नाही. अशांचा केवळ सन्मान करून भागणार नाही. अशा लोकांना ताकद देणे गरजेचे आहे. त्यांना ताकद दिली तर त्यांचा रिस्पेक्ट ते स्वत: मिळवतील असे राहुल गांधी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न

जाती जनगणनेचे नाव घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोप उडाली आहे. ते म्हणतात जातीय जनगणना करून राहुल गांधी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देशातील जनतेला त्यांचा देशातील रोल काय हे समजले पाहीजे. त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळालाच पाहीजे. आज अनेक जाती धर्मातील लोकांना त्यांचा न्यायहक्क मिळत नाहीत. देशाची संपत्ती किती जणांकडे आहे हे ही त्यातू स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जायीत जनगणना महत्वाची आहे. या 90 टक्के लोकांच्या हिताचे आपण बोलत आहोत. त्यामुळे आपल्यावर टीका होत आहे. पण त्याची आपण परवा करत नाही. या लोकांना हक्क मिळवून देणार असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - BJP Action : भाजपने 40 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी; काय आहे कारण?

संविधानावर आरएसएस आड मार्गाने हल्ले करत आहे. त्यांची थेट हल्ला करण्याची हिंम्मत नाही. जर त्यांनी थेट हल्ला करायचा ठरवला तर आम्ही ही त्यांना आव्हान देवू या कसा हल्ला करताय ते आम्ही बघतोच. पण ते तसं करणार नाहीत. कारण ते घाबरट आहेत असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरातच केला. संविधान हे एक पुस्तक नाही. तर ते देशाचे व्हिजन आहे. देशाच्या जगण्याची पद्धती आहे. एकमेकाचा आदर करा. सन्मान करा. हे आपल्याला संविधान शिकवतं. समानता हा या संविधानाचा पाया आहे. सर्व धर्माचा, जातीचा, भाषेचा, प्रदेशाचा आदर झाला पाहीजे हे ही संविधान सांगत आहे असे राहुल म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?

संविधानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मनातील नाही तर जनतेच्या मनातील संवेदना मांडल्या आहेत. तो गरीबांचा आवाज आहे. आंबेडकर बोलायचे तेव्हा करोडो लोकांचा तो आवाज होता. त्यामुळे आपण आजही त्यांची आठवण काढतो असे राहुल म्हणाले. दुसऱ्याचं दुख: त्यांनी मांडलं. देशाने आंबेडकरांना संविधान बनवायला सांगतलं होतं. फक्त काँग्रेसने नाही. याच संविधानात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिबिंब दिसते.