अमेठीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी सोडलं मौन, निवडणूक लढवण्यावर दिलं उत्तर

Rahul Gandhi : अमेठीमध्ये गांधी कुटुंबातील कोणता सदस्य लढणार का? राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीचं आव्हान स्वीकारणार का? हे प्रश्न अजूनही कायम आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी अमेठीच्या प्रश्नावर अखेर मौन सोडलं आहे. (फोटो सौजन्य ANI)
मुंबई:

Rahul Gandhi on Amethi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचलाय. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी होणार आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीतील काही प्रतिष्ठेच्या जागेवर कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उत्तर प्रदेशातील अमेठी हा यापैकी एक मतदारसंघ आहे. अमेठी हा एकेकाळी गांधी परिवाराचा बालेकिल्ला होता. मागील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या स्मृती इराणी यांनी तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत काँग्रेसचा गड उद्धवस्त केला. त्यानंतर या निवडणुकीत भाजपानं अमेठीतून स्मृती इराणींना पुन्हा उमेदवारी जाहीर केलीय. पण, काँग्रेसनं अद्यापही स्मृती इराणींचाी प्रतिस्पर्धी जाहीर केलेला नाही.

अमेठीमध्ये गांधी कुटुंबातील कोणता सदस्य लढणार का? राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीचं आव्हान स्वीकारणार का? हे प्रश्न अजूनही कायम आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आज (बुधवार, 17 एप्रिल) रोजी राहुल गांधी आणि समाजावदी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना याबाबतचं प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अखेर राहुल यांनी या विषयावरील मौन सोडलं आहे.

भारतीय राजकारणातील Noob कोण? मोदींनी गेमर्सला दिलं असं उत्तर
 

काय म्हणाले राहुल? 

'मला जो आदेश (पार्टीकडून) मिळेल, त्याचं मी पालन करेन. आमच्या पक्षातील सर्व उमेदवारांची निवड काँग्रेल कार्यकार्यकारिणी समितीमध्ये केली जाते,' असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं. राहुल गांधींनी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवण्याबाबत नकार दिलेला नाही. 

26 वर्षांच्या तरुणामुळे भाजपाचं मिशन धोक्यात

अँटोनी यांनी दिले होते संकेत

ज्येष्ठ काँग्रेस नेते ए.के. अँटोनी यांनी यापूर्वी एका मुलाखतीमध्ये या विषयावर संकेत दिले होते.  'तुम्ही अमेठी आणि रायबरेलीबाबतच्या निर्णयाची प्रतीक्षा करा. त्याबाबत अंदाज लावू नका. गांधी कुटुंबातील एक सदस्य उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवेल,' असं अँटोनी यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. रॉबर्ट वाड्रा उमेदवार असतील का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला त्यावर तसं होणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. धर्मनिरपेक्ष पक्षांना गांधी कुटुंबावर पूर्ण विश्वास असल्याचं माजी संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.