...तो पर्यंत चप्पल घालणार नाही!, नेत्यासाठी 'त्यानं' असं का केलं?

जाहिरात
Read Time: 2 mins
बुलढाणा:

लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. आपला नेता जिंकावा म्हणून कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत. पण काही कार्यकर्ते असेही आहेत जे आपल्या नेत्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार आहे. अशाच एका कार्यकर्त्याची जोरदार चर्चा आहे. हा कार्यकर्ता आहे शेतकरी संघटनेचे नेते रविकात तुपकर यांचा. त्यानं भर कडक उन्हात असा काही पण केला आहे ज्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत.

कार्यकर्त्याचा नेत्यासाठी संकल्प 
राम वसंतराव देवरे. बुलढाण्याचे रहिवाशी. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे खंदे सर्मथक. रविकांत तुपकर हे शेतकरी संघटनेकडून बुलढाण्यातून लोकसभेच्या रिंगणात आहेत. तुपकर विजयी व्हावेत म्हणून देवरे यांनी एक संकल्प केला आहे. रविकात तुपकर विजयी झाल्यावरच आपण पायात चप्पल घालू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या बुलढाण्यात ४२ डिग्री तापमान आहे.  अशा कडक उन्हातच ते अनवाणी तुपकरांचा प्रचार करणार आहेत. सध्या ते प्रचारासाठी चप्पल शिवायच गावोगाव फिरत आहेत.  त्यांनी आपल्या नेत्यासाठी केलेल्या या संकल्पाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. काही झालं तरी तुपकरांना विजयी करायचचं यासाठी देवरे आपल्या सहकार्यांसह झटत आहेत. विजयाचा गुलाल अंगावर घेतल्यानंतर पायात चप्पल घालू हा त्यांचा पण आहे. 

Advertisement


एक हाताने सारथ्य
देवरे यांच्या प्रमाणेच गजानन डिघोळे. खांद्याची नस दबल्याने, इलाज घेऊनही त्याचा उजवा हात ३ वर्षांपासून निकामी आहे. मात्र हा पठ्ठा एका हाताने मारुती अल्टो कार चालवितो. बारा तेरा तास प्रचार ते प्रचारा निमित्त फिरतात गाडी चालवतात. त्यांना हातावर इलाज करायचा आहे. पण त्यांनीहा या निवडणुकीच्या धामधूममध्ये इलाजा बाजूला सारलं आहे. निवडणूक झाल्यानंतरच आपण हातावर इलाज करू असं डिघोळेंनी ठरवलं आहे. संदीप देवरे, अनिल देवरे आणि गजानन डिघोळे हे जीवाभावाचे मित्र. या तिघांनीही रविकांत तुपकरांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आंदोलनात ते तुपकरांबरोबर होते. आता त्यांनी आपल्या या सहकाऱ्याच्या विजयासाठी पडेल ती मेहनत करण्याचा निर्धार केला आहे. 

Advertisement