मी नसतो तर तुझ्या बापाची.....! रामदास कदम आदित्य ठाकरेंवर संतापले

मदास कदम आणि योगेश कदम यांची नावे न घेता आदित्य यांनी म्हटले होते की,काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर

गुरुवारी दापोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी दापोलीचे आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. हे दोघे गद्दार आहेत असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. या सभेनंतर रामदास कदम यांनीही आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. ठाकरेंची साथ सोडत असताना रामदास कदम यांनी दिलेल्या मुलाखतीत ते रडले होते.  यावरून आदित्य ठाकरेंनी रामदास कदम यांना टोला लगावला होता. रामदास कदम आणि योगेश कदम यांची नावे न घेता आदित्य यांनी म्हटले होते की,काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी.

नक्की वाचा : 'टीव्हीवर रडणारे गद्दार, बर्फाच्या लादीवर झोपवणार' कदमांना आदित्य यांनी काय-काय सुनावले

आदित्य यांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना रामदास कदम यांनी म्हटले की आदित्य ठाकरे यांना योगेश कदम यांना गद्दार म्हणताना लाज वाटली पाहिजे.  योगेश कदम यांना मित्र म्हणता म्हणता आदित्य ठाकरेंनी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला. दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना योगेश कदम यांना विचारात घेतले नाही. स्थानिक आमदार असूनही त्यांना बाजूला सारले, असे करताना आदित्य ठाकरेंना लाज वाटली नाही का असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. कदम म्हणाले की आदित्य ठाकरे हे मला काका म्हणायचे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काकाचे पर्यावरण खातेही आदित्य ठाकरेंनी घेतले तेव्हा त्यांना लाज वाटली नाही का ?

Advertisement

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले

आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी म्हटले की, बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा करतोस, तुझी औकात आहे का ? नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा मातोश्रीबाहेर निघायचे तेव्हा ते मला पुढच्या सीटवर बसवायचे. मला पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय ते बाहेर पडत नव्हते. मी नसतो तर तुझ्या बापाची XX पिवळी झाली असती, अशा शेलक्या भाषेत कदम यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे.  आदित्य यांनी केलेल्या टीकेमुळे भडकलेल्या रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की मी गृहखाते बघितले असल्याने कोणाला बर्फाच्या लादीवर झोपवायचे, कोणाची नालबंदी करायची हे मला चांगले ठाऊक आहे, तुला अजून खूप पावसाळे बघायचे आहेत असे म्हटले.

Advertisement