'पान टपरीवाल्याला पुन्हा टपरीवर बसवायचे'

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटात सहभागी झालेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी श्रीराम पाटील आणि करण पाटील यांना लोकसभेवर निवडून देण्याचे आवाहन ही केले. मात्र त्यांचे भाषण गाजले ते शिंदे गटाच्या नेत्यांवर केलेल्या शाब्दीक हल्ल्यामुळे...

हेही वाचा - संभाजीनगरमध्ये महायुतीला दिलासा, विनोद पाटील यांचा निर्णय जाहीर

संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल 

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गद्दारी झाली. या मतदार संघातील गद्दारांना गाडायचे आहेत. या जिल्ह्यातले गद्दार 250 खोके घेऊन बसले आहेत. तेच आपली सभा आता लपून पाहात आहेत. त्यात एक पानटपरीवाला आहे. त्याला पुन्हा एकदा पान टपरीवर बसवायचे आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता त्यांनी असे वक्तव्य केले. गुलाबराव पाटील हे राजकारणात येण्या आधी पान टपरी चालवत होते. असे तेच नेहमी आपल्या भाषणातून सांगत. बाळासाहेबांमुळे एक टपरीवाला आमदार झाला पुढे मंत्री झाला असेही ते सांगत असतात. 

भाजपवर केला हल्लाबोल

भाजप हा चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे. त्यांचे मुखिया नरेंद्र मोदी आहेत असा जोरदार हल्ला राऊत यांनी चढवला. शिवाय भाजपला महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणूनच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असा आरोप त्यांनी केला. यावेळी 400 पार नाही तर भाजप तडीपार हा नाराही त्यांनी दिला. 400 पार म्हणजे तुमच्या बापाची लोकशाही आहे का असा सवाल ही त्यांनी केला. 

देशात इंडिया आघाडीचे सरकार 

लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर मोदी आणि शहांना गुजरातला पाठवायचे आहे असेही ते म्हणाले. शिवाय ज्या जेलमध्ये मला टाकले त्याच जेलमध्ये भाजपवाल्यांना टाकणार असेही ते म्हणाले. शिवाय मोदी गॅरंटी देत फिरत आहेत. पण निवडून येण्याची गॅरंटी ते देणार आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली. 

Advertisement