अभिजीत बिचुकलेचं नाव संपूर्ण राज्याला आता परिचित झालं आहे. निवडणुका आणि अभिजीत बिचुकले याचं एक वेगळच समिकरण आहे. लोकसभा असो की विधानसभा अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात असतात. त्यांनी थेट राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवण्याचा ही निर्धार केला होता. पण त्यांची ती संधी हुकली. नाही लोकसभा नाही विधानसभा. मग आता त्यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अभिजीत बिचुकले आता थेट सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नेहमी प्रमाणे कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता बिचुरले यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आपण आपल्या जिवनात प्रथमच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहोत. त्यासाठी उमेदवारी अर्ज ही दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. सातार नगरपालिका ही आपली मातृसंस्था आहे. याच ठिकाणी आपण नोकरी करत होतो. पण काही नालायक लोकांमुळे मला कामावरून काढून टाकण्यात आलं असं ते यावेळी म्हणाले.
त्याला कारण मी माझ्या पत्नीच्या प्रचारात भाग घेतला होता. तसा आरोप आपल्यावर झाला. मात्र या नगरपालिकेची सर्व अंडीपिल्ली मला माहित आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर ही सर्व बाहेर काढणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. साताऱ्यात गेल्या पंचवीस वर्षात रस्त्यांना तसेच खड्डे आहेत. रस्तेतही तसेच आहोत. बागांची अवस्था वाईट आहे. मला एक संधी द्या साताऱ्याचं सितारा करून दाखवतो. साताऱ्याचा खरा सितारा मीच आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे नगराध्यक्षपद माझ्या पदरात टाका मी साताऱ्याचं नक्की सितारा करून दाखवतो असं ते म्हणाले.
लोकसभा आणि विधानसभेला मला लोकांनी खूप प्रेम दिलं. आता त्यांनी नगराध्यक्षपदासाठी मला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. साताऱ्याचे खरे आदर्श अरूण काका गोडबोले होते. पण त्यांच्यासाठी काही झालं नाही. ते साताऱ्याचे वैभव होते. ते वैभव गेलं. मात्र आता साताऱ्याचं वैभव आपण पुन्हा आणू असे आश्वासन त्यांनी दिलं. आपण नगराध्यक्ष झाल्यावर बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक साताऱ्यात करू असं ही ते म्हणाले. साताऱ्याचं नाव रोषण करणार. सातारा माझ्या हातात द्या. मी पुण्यात राहतो. पण मनात सातारा आहे. मी साताऱ्याच सितारा आहे असं म्हणत त्यांनी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. दरम्यान साताऱ्यात बिचुकले यांनी दोन्ही राजेंना थेट आव्हान दिलं आहे.