गेले अनेक दिवस मुंबई उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला पाहायला मिळत होता. या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपनेही या मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. सरकारी वकील म्हणून नावलौकीक मिळवणाऱ्या उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. 93 चा बॉम्बस्फोट खटला असेल अथवा मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबचा खटला असेल निकम यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होईल याची खातरजमा केली होती.
पूनम महाजन यांचा पत्ता कट
मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात पूनम महाजन भाजपाच्या खासदार होत्या. दिवगंत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या आहेत. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. 2009 साली त्यांनी घाटकोपर पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. मागील निवडणुकीतही त्यांनी ही जागा राखली होती. यंदा त्यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी भाजपानं दिली नाही.
(नक्की वाचा : काँग्रेसला मुस्लीम मतं हवीत, उमेदवार नको ! माजी मंत्र्यांनी दिला घरचा आहेर )
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसनं मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री नसीम खान देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. खान यांनी तिकीट न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस यांना मुस्लीम मतं हवीत पण, मुस्लीम उमेदवार नको अशी टीका खान यांनी केली होती. त्यानंतर AIMIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी खान यांना मुंबईतील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world