जाहिरात
This Article is From Apr 27, 2024

काँग्रेसला मुस्लीम मतं हवीत, उमेदवार नको ! माजी मंत्र्यांनी दिला घरचा आहेर

लोकसभा निवडणुकीत मुस्लीम उमेदवाराला तिकीट न मिळाल्यानं (Loksabha Elections 2024) महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यानं नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसला मुस्लीम मतं हवीत, उमेदवार नको ! माजी मंत्र्यांनी दिला घरचा आहेर
मुस्लीम मतांच्या प्रश्नावर काँग्रेसनं पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत मुस्लीम उमेदवाराला तिकीट न मिळाल्यानं (Loksabha Elections 2024) महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यानं नाराजी व्यक्त केली आहे. मोहम्मद आरिफ 'नसीम खान' (Congress Leader Arif Naseem Khan) यांनी राज्यात यांनी एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलं नाही म्हणून प्रचार समितीमधून राजीनामा दिलाय. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहलंय. महाविकास आघाडीनं एकाही मुस्लीम उमेदवाराला मैदानात उतरवलं नसल्यानं आपण प्रचार करणार नसल्याचं त्यांनी कळवलंय. 

माजी राज्यमंत्र्यांनी लिहलंय की, 'महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीनं एकाही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. काँग्रेस किमान एक अल्पसंख्याक उमेदवाराला संधी देईल अशी संपूर्ण राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते यांना आशा होती. पण, दुर्दैवानं तसं झालं नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

... म्हणून प्रचार करणार नाही

'काँग्रेसला मुस्लिमांची मतं हवी आहेत. मुस्लीम उमेदवार का नको?' असं सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मला विचारत आहेत. 'मी याच कारणांमुळे मुसलमानांना सामोरं जाऊ शकत नाही. माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही,' असं नसीम खान यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रचार समितीमधून राजीनामा देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी 17 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. नसीम खान मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून इच्छूक होते. पण, काँग्रेसनं त्यांना डावलत वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. नसीम खान यांनी यापूर्वी 2019 मध्ये चांदिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा 409 मतांनी पराभव झाला होता. 

( नक्की वाचा : 'उबाठा' ला बाळासाहेब ठाकरेंची लाज वाटते, शिवसेनेचा थेट आरोप )
 

काँग्रेस विचारधारेपासून दूर 

नसीम खान यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'काँग्रेस पक्ष आपल्या विचारधारेपासून दूर गेलाय, असं वाट आहे. अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना तसंच कार्यकर्त्यांचे फोन आले. काँग्रेसनं निवडणुकीत तिकीट देताना माझ्याकडं दुर्लक्ष का केलं हा प्रश्न त्यांनी विचारला. अल्पसंख्याक समुदायावर अन्याय का झाला? या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही. पक्ष आपली सर्वसामावेशक विचारधारा आणि सर्व समुदायांना प्रतिनिधित्व देण्यापासून दूर गेला आहे.' 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com