पोर्शे कार अपघात प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे हे टीकेचे धनी ठरले होते. कार अपघात झाल्यानंतर आरोपीला वाचवण्यासाठी टिंगरे हे थेट पोलिस स्थानकात गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यात महाविकास आघाडीतील पक्ष आघाडीवर होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे आमदार असलेले सुनिल टिंगरे यांनी थेट शरद पवारांना नोटीस पाठवली आहे. शिवाय या नोटीसच्या माध्यमातून आपली बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. या नोटीशीची प्रत खासदार सुप्रिया सुळे या पत्रकार परिषदेत दाखवली. याशिवाय ही नोटीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जू खरगे आणि उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात अल्पवयीन तरूणाने भरधाव वेगाने पोर्ट कार चालवली होती. मद्य प्राशन करून ही कार चालवली गेली होती. त्या कारचा अपघात झाला होता. त्यात रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या एक तरूण आणि तरूणीचा मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर आरोपीला तिथल्या लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. या अपघाताची बातमी मिळताच अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिस स्थानक गाठले होते. शिवाय आरोपीची बाजू घेतली होती अशा बातम्या बाहेर आल्या होत्या. शिवाय त्याला सोडून द्यावे यासाठी त्यांनी पोलिसांवर दबावही टाकल्याचं बोललं जातं.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस, राज ठाकरे, आंबेडकर हे आतून एक, रोखठोक मधून राऊतांनी ठोकून काढलं
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने सुनिल टिंगरेंसह अजित पवारांनाही घेरलं होतं. त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. दोन निष्पाप तरूणांचे बळी घेतले. त्याचीच वकील टिंगरे करत होते असा आरोपही झाला. आरोपी आणि टिंगरे यांचे जुने संबध असल्याची बाबही समोर आली होती. त्यामुळे टिंगरेंच्या अडचणी वाढतच गेल्या होत्या. शेवटी अजित पवारांसह पोलिसांनाही या प्रकरणी स्पष्टी करण द्यावं लागलं होतं. त्यानंतर आता टिंगरेंनी या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरवले आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'मी काय म्हातारा झालोय का? 84 वर्षाचे शरद पवार असं का म्हणाले?
त्यामुळेच त्यांनी थेट शरद पवारांनाच नोटीस पाठवली आहे. त्या नोटीशीत त्यांनी शरद पवार यांनी बिनाशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. शिवाय या पुढे जर पोर्श अपघातावरून आपल्यावर टीका किंवा आरोप केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करू असा इशारा नोटीस मधून देण्यात आला आहे. ही नोटीस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. या नोटीसची प्रतही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली.
ट्रेंडिंग बातमी - आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?
शरद पवारां प्रमाणे ही नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान टिंगरे यांच्यावर केलेले आरोप हे पोलिसांनी दिलेली माहिती आणि पत्रकारांच्या बातम्या अधारे केले होते. त्यात आम्ही काय चुकीचं केलं. त्याच बरोबर आम्ही कसली माफी मागायची असा सवालही त्यांनी केला आहे. त्याच बरोबर तुम्ही अपघात झाल्यानंतर पोलिस स्थानकात गेला होता हे सर्वांना माहित आहे असंही त्यांनी सांगितलं. मात्र लोकशाहीत बोलणं हे चुकीच आहे का? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने केला आहे.