दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले

स्वच्छ प्रतिमा असलेला, उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा लौकीक होता. अशा नेत्यासंबंधी उलटसुलट चर्चा होणे हे असंवेदनशील पणाचे लक्षण आहे असे शरद पवार म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याबाबत आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली होती. सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीला आर. आर. पाटील यांनीच मंजूरी दिली होती. आबांसाठी आपण भरपूर काही केले. पण त्यांनी केसाने गळा कापला असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय अजित पवारांना कडक शब्दाक सुनावले आहे.स्वच्छ प्रतिमा असलेल्या दिवंगत नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न शरद पवारांनी केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्वच्छ प्रतिमा असलेला, उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा  लौकीक होता. अशा नेत्यासंबंधी उलटसुलट चर्चा होणे हे असंवेदनशील पणाचे लक्षण आहे असे शरद पवार म्हणाले. हे घडलं नसतं तर आनंद झाला असता. जी व्यक्ती जाऊन 9 वर्षे झाली. त्या व्यक्तीसंदर्भात चर्चा होणे योग्य नव्हते. अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप कोणी केले? त्या मागे कोण होते. याचा विचार अजित पवारांनी आधी करणे गरजेचे होते असेही ते म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर कुटुंबातही फूट; पवार कुटुंबीयांची एकत्र दिवाळी पाडव्याची परंपरा खंडित

सत्ता हातात असल्यानंतर आपण काही बोलायला मुक्त आहोत, असा समज काही घटकांचा असतो, हा त्याचाच कदाचित भाग असेल अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं आहे. सिंचन घोटाळ्याचा आरोप कधी ही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी केला नाही. तो आरोप कोणी केला? कधी केला हे सर्वांना माहित आहे. ते वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा वेळी थेट आर. आर. पाटील यांना लक्ष करणे किती योग्य आहे असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - "एकनाथ शिंदे संकुचित विचारांचे", मनसेची माहीमच्या जागेवरून टीका

आर. आर. पाटील यांनी चौकशीच्या फाईलवर सही केली होती. ती सहीच देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली होती असे अजित पवार म्हणाले होते. याचाही समाचार शरद पवारांनी घेतला. एखादी व्यक्ती ज्या वेळी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर बसते त्यावेळी त्यांना गोपनियतेची शपथ दिली जाते. तशी शपथ मी पण सात वेळा घेतली आहे. त्यात गोपनियतेचे पालन करेन असा उल्लख होता. आताही तो असतो. त्यामुळे या प्रकरणात गोपनियतेच्या शपथेचा भंग झाला आहे असा आरोप शरद पवारांनी केला. 

Advertisement