जाहिरात
Story ProgressBack

इंडिया आघाडीचा मोठा डाव? शरद पवारांवर मोठी जबाबदारी, दिल्लीत हालचालींना वेग

इंडिया आघाडीनेही प्रयत्न केल्यास ते सत्तेच्या जवळ जावू शकतील अशी स्थिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने अजूनही आपले पत्ते स्पष्ट केले नाहीत.

Read Time: 2 mins
इंडिया आघाडीचा मोठा डाव? शरद पवारांवर मोठी जबाबदारी, दिल्लीत हालचालींना वेग
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणूक पार पडली आहे. सर्व निकालही हाती आले आहेत. निकाल पाहात एनडीएला सत्ता स्थापन करता येणार आहे. पण इंडिया आघाडीनेही प्रयत्न केल्यास ते सत्तेच्या जवळ जावू शकतील अशी स्थिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने अजूनही आपले पत्ते स्पष्ट केले नाहीत. याचा भाग म्हणून आज इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत होत आहे. यासाठी सर्व प्रमुख नेते दिल्लीत येत आहेत. त्याच वेळी एनडीएची बैठकही दिल्लीत होत आहे. दरम्यान सध्याच्या राजकीय स्थितीत तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे किंगमेकर झाले आहेत. त्यामुळे या दोघांनाही आपल्या गोटात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले  आहेत. 

हेही वाचा - तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर 

इंडिया आघाडीत शरद पवार हे सर्वात जेष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांचा सर्वपक्षीयां बरोबर असलेले संबध पाहात त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार ते चंद्रबाबू नायडू आणि नितिश कुमार यांच्या संपर्कात आहेत. पवार या दोन्ही नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीत या दोन्ही नेत्यांनी यावे यासाठी पवारांचे प्रयत्न आहेत. तेस झाल्यास इंडिया आघाडीला सरकार स्थापण्यास मदत होऊ शकते. इंडिया आघाडी सत्तेच्या जवळ जावू शकते. नितीश कुमारांना 12 जागा मिळाल्या आहेत. तर चंद्राबाबूंना 16 जागा मिळाल्या आहेत. तर 28 जागा इंडिया आघाडीकडे आल्या तर त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळेच शरद पवारांवरही जबाबदारी दिल्याचे समजत आहे. 

हेही वाचा -  'मला पाडण्याचा स्वकीयांनीच प्रयत्न केला' कोकणात निकालानंतर शिमगा

लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी आणि एनडीएच्या नेत्यांनी दिल्लीकडे कुच केली आहे. दोन्ही आघाड्यांच्या बैठका होणार आहे. त्यात पुढील रणनिती ठरणार आहे. भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करणे शक्य नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांना मित्रपक्षावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यासाठी चंद्रबाबू नायडू आणि नितिश कुमार हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत. तर हे दोघेही कधी काळी भाजप विरोधी नेते होते. त्यांनी मोदींना विरोध केला होता. त्यामुळे त्यांना आपल्या गोटात कसे घेता येईल याचा विचारही दिल्लीत सुरू आहे. दरम्यान नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोन्ही नेते आज दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आपली भूमीका स्पष्ट करतील. मात्र या मुळे राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे हे मात्र निश्चित आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Lok Sabha Election 2024 Live Update : एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना दिलं समर्थन पत्र
इंडिया आघाडीचा मोठा डाव? शरद पवारांवर मोठी जबाबदारी, दिल्लीत हालचालींना वेग
Sanjay Raut's claim that the India Alliance will form the government
Next Article
'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला
;