'सगळ्यांचा नाद करायचा पण...' शरद पवारांचं धमाकेदार भाषण

एकदा का रस्ता चुकला तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. उद्याच्या निवडणुकीत यांना साधंसुधं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं.

जाहिरात
Read Time: 3 mins
सोलापूर:

शरद पवारांनी राज्यात एकामागू एक सभांचा धडाका लावल आहे. ते प्रत्येक सभा गाजवत आहेत. त्यांच्या प्रत्येक सभेलाही तसाच प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक सभेत पवार कोणता तरी डायलॉग मारत आहेत ज्यामुळे लोकंही ती सभा डोक्यावर घेत आहेत. माढ्याच्या सभेत शरद पवारांनी बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना झोडून काढलं. या दोघा भावांना यावेळी असं पाडायचं की महाराष्ट्रात संदेश गेला पाहीजे. सगळ्यांचा नाद करायचा पण शरद पवाराचा नाद करायचा नाय असं सांगत त्यांनी सभा गाजवून सोडली. त्यांच्या या वाक्याने माढ्याच्या सभेत उपस्थितीतांनी एकच जल्लोष केला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माढा विधानसभा मतदार संघात शरद पवारांची सभा झाली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार बबनदाद शिंदे आणि करमाळ्याचे आमदार त्यांचे बंधू संजय शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले माढ्याच विचित्र स्थिती आहे. मी इथून लोकसभा जिंकली. त्यावेळी इथं जो निधी आणायचो तो बबनदाद शिंदे यांच्याकडे द्यायचो. त्यांना सर्व अधिकार दिले होते. विश्वास होता म्हणून असं करत होतो. पुढे आमची सत्ता केली. पक्षात फाटाफूट झाली. त्यात कोण खरा कोण खोटा, कोण आपला हे समजलं असं शरद पवार म्हणाले. आपला खरा साथिदार कोण हे त्यातून समजलं.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? थेट नाव सांगितलं, शिंदेंचा शिलेदार शेवटी बोललाच

माढ्याचे महाशय माझ्याकडे आले होते. ते म्हणाले मला इडीची नोटीस आली आहे. त्यांना नोटीस आली त्यानंतर हा गडी गायब झाला. ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्यांना कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. आमचे हात स्वच्छ आहेत असंही ते यावेळी म्हणाले. काही दिवसांनी ही मंडळी माझ्याकडे परत आले. मी म्हटलं काय झालं. त्यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली.  मी म्हटलं नवी लोकांना संधी द्या. त्यांच्या डोक्यात एकच होतं. त्यांचा लेक. मी त्यांना म्हटलं तुम्हाला परत नोटीस आली तर काय करणार. ते म्हणाले मी तुमच्या बरोबर चाळीस आहे. म्हणजे मी त्यांना चाळीस वर्ष मदत केली. मात्र ज्या वेळी संकट आलं त्यावेळी एक करमाळ्याला पळाला एक माढ्याला पळाला. प्रसंगाला हे पट्टे कुठे गायब होतात समजत नाही अशी टीका शरद पवारांनी केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO

यावेळी त्यांनी 1980 चा किस्सा सांगितला. आपल्या पक्षाकडून 58 आमदार निवडून आणले होते. पण काही दिवसासाठी परदेशात गेलो. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अंतूले यांनी चमत्कार केला. 58 पैकी 52 आमदार फोडले. ते काँग्रेसमध्ये गेले. माझ्याकडे केवळ सहा जण राहीले. विरोधी पक्षनेते पद ही गेले. त्यानंतर संघर्ष केला. त्या 52 पैकी एकही जण पुढच्या निवडणुकीत निवडून आला नाही. मला सोडून जे जे गेले ते पडले. आता पण जे सोडून गेले आहेत त्यांचं काय करायचं असा सवाल ही पवारांनी यावेळी केला. जे कोणी असतील. एकदा का रस्ता चुकला तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. उद्याच्या निवडणुकीत यांना साधंसुधं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं. महाराष्ट्राला संदेश गेला पाहीजे. सगळ्यांचा नाद करायचा पण शरद पवाराच नाद करायचा नाही असं ते सर्वात शेवटी म्हणाले. 

Advertisement