'राणेंना दोन मुलं आहेत, तिसरा असता तर त्याला...' सुषमा अंधारेंनी डिवचलं

राणेंचा गेम भाजपच करणार असल्याचं यावेळी अंधारे म्हणाले. कोकणात प्रचाराला आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

जाहिरात
Read Time: 3 mins
सिंधुदुर्ग:

विधानसभा निवडणुकीचा धुरळा सर्वत्र उडत आहेत. त्यात आता शिवसेनेच्या फायबँड नेत्या सुषमा अंधारे या कोकणाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर सडकून टीका केली आहे. राणेंचा गेम भाजपच करणार असल्याचं यावेळी अंधारे म्हणाले. कोकणात प्रचाराला आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवाय मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांचेच गडी बाद करत आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कोकणात सर्व जाग्या या महायुतीच्या निवडून येतील असा दावाही त्यांनी केला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोकणात सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत. त्या आधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला. राणेंनी आपल्या दोन मुलांना दोन मतदार संघातून निवडणुकीला उभं केलं आहे. ते स्वत: खासदार आहेत. त्यांना जर तिसरा मुलगा असता तर त्याला नारायण राणे यांनी सावंतवाडीतून उभं केलं असतं असा टोला अंधेरे यांनी लगावला आहे. त्यांना विकासाचा ध्यास आहे. त्यांना असं कोणतं पद मिळालं नाही, की ते विकास करू शकले नाहीत अशी विचारणाही त्यांनी या निमित्ताने केली. 

ट्रेंडिंग बातमी - 'चला आपण एकत्र येवू', भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साद, नेमकं काय घडलं?

 जो माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही. तर अजून कोणतं पद पाहीजे होतं मग कोकणचा विकास झाला असता अशी विचारणाही त्यांनी केली आहे. ट्रम तात्यांच्या ऐवजी नारायण राणेना ते पद दिलं पाहिजे होतं असा चिमटाही त्यांनी काढला. कोकणात दहशत आहे. ती दूर करण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं पाहीजे असंही त्या म्हणाल्या. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. यावेळी त्यांनी निलेश आणि नितेश राणे यांच्यावरही टीका केली.  निलेश राणे जेंव्हा तोंड उघडतात तेव्हा तेव्हा महाविकास आघाडीची मतं वाढतात. ते आमचे स्टार प्रचारक होतात असंही त्या म्हणाल्या.  

ट्रेंडिंग बातमी - भिवंडीत समीकरण बदलणार? कपिल पाटलांनी सुत्र फिरवली, शिंदेंचा फायदा होणार?

ज्या एकनाथ शिंदेनी धर्मवीर चित्रपट बनवला. त्यांनी आता  निलेश राणेंची मुक्ताफळ दाखवावीत. याच निलेश राणे यांनी बाळासाहेबांचा उल्लेख खूनी, आरोपी असा केला होता. असं वक्तव्य करणारे निलेश राणे हे शिंदेंना चालतात का असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. याबाबत शिंदेंनी बोललं पाहीजे. बाळासाहेबांवर चिखलफेक करणारे निलेश राणे शिंदेंना चालतील का? अशी विचारणाही त्यांनी केली. ज्या नारायण राणे यांनी शिवसेनेचे चिन्ह संपविण्याचा घाट घातला होता. त्याच चिन्हावर आपल्या मुलाला लढवणारे राणे तुम्हाला चालतात का अशी विचारणाही त्यांनी केली. 

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा, भिजतच ठोकलं भाषण

राणेंच्या पराभवासाठी आता भाजपच प्रयत्न करत आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी या निमित्ताने केला. राणेंनी कायम कोकण लुटून खाण्याचा प्रयत्न केला. कोकणातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार असंही त्या म्हणाले. यावेळी खुद्दारी विरुद्ध गद्दारी अशी लढत आहे.नितेश राणे यांनी तोंड उघडल की गटाराचं झाकण उघडल्यासारखं वाटतं. शिवाय भाजप मधील लोक अस्वस्थ आहेत. असं ही त्या म्हणाल्या. फडणवीसांनी फार लवकर शस्त्र टाकली आहेत. तर राज ठाकरे यांनी महायुतीची सुपारी घेतली आहे असा आरोपही त्यांनी केला.  

Advertisement