उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा राज्यात रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांची गुप्त भेट घेतल्याची बातमीही समोर आली. त्यामुळे उद्धव यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली होती. आता तर उद्धव ठाकरे यांनी चक्क भाजप कार्यकर्त्यांना साद घालत, चला आपण एकत्र येवू असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहाना नंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही घडलं आहे ते सिल्लोडमध्ये. सिल्लोड इथं झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आव्हान केलं. या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे अब्दुल सत्तार निवडणूक लढवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी थेट भाजप कार्यकर्त्यांनाच गळ घातली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिल्लोड विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेश बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांच्या बरोबर आहे. सुरेश बनकर हे मुळचे भाजपचे आहेत. भाजप आणि अब्दुल सत्तार यांच्यात या मतदार संघात नेहमीच संघर्ष राहीला आहे. सत्तार महायुतीत असल्यामुळे ही जागा भाजपला सुटणे अवघड होते. त्यामुळे बनकर यांनी भाजपला रामराम करत ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. त्यामुळे बनकरांना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भाजपच्याही कार्यकर्त्यांचे समर्थन मिळणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?
हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. तुमचा सत्तारांबरोबर नेहमीच संघर्ष राहीला आहे. त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी तुम्हाला मान्य आहे का? अशा गद्दाराला तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का? भाजपचा जो सच्चा कार्यकर्ता आहे तो कधीही अब्दुल सत्तार यांना मतदान करणार नाही. त्यामुळे चला आपण एकत्र येवून ही गुंडागर्दी मोडून काढू. त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू. पण इथं एकत्र येवून या गद्दाराला गाडू असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना या सभेत केलं. या गद्दाराला पाडा असे आवाहन करत सत्ता आल्यानंतर चौकशी करून या गद्दाराला जेलमध्ये टाकू असे ठाकरे म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - "आम्ही हे करणार", राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
सिल्लोडमधील गुंडागर्दी, दडपशाही जाळून टाकायला आपण इथं आलो आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही सर्वजण एकवटलात तर समोरचा व्यक्ती कितीही शक्तीशाही असो त्याचा पाडाव हा नक्की होतो. याच अब्दुल सत्तार यांनी कॅमेऱ्या समोर सुप्रिया सुळे यांना शिव्या दिल्या होत्या. असा व्यक्तीला तुम्ही निवडून देणार आहात का? अशा व्यक्तीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सभा घेतात हेच तुमचं हिंदूत्व आणि संस्कार आहेत का? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी केला. दरम्यान मुंबईच्या सभेत खुर्च्यांची गर्दी दिसली. पण लोकांची गर्दीच दिसली नाही असे ते म्हणाले.
(नक्की वाचा- होय,भाजपसोबत बैठक झाली होती! शरद पवारांची कबुली)
लोकसभेला इथल्या जनतेने कल्याण काळेंनी निवडून दिलं आहे. आता विधानसभेला ही तुम्हाला आघाडीच्या उमेदवाराला जिंकून द्यायचे आहे असे ते म्हणाले. सरकार आल्यानंतर आपण सोयाबिनला सात हजाराचा भाव देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकऱ्याला हमीभाव नाही आणि गद्दाराला भाव आहे हे चालणार नाही असं ही ते म्हणाले. यांना अडीच वर्षात लाडकी बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आठवण आली. त्यांना तुम्ही जे पैसे देत आता ते काय तुमच्या खिशातून देत नाही तर जनतेचे पैसे देत आहात असे ठाकरे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world