ठाकरेंचा नवा डाव, मुंबईत 22 जागांवर लढण्याची तयारी... वाचा संभाव्य यादी

Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंसाठी मुंबई अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या पक्षानं 22 मतदारसंघात लढण्याची तयारी सुरु केली असून संभाव्य उमेदवारांची यादी देखील तयार केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी 3 पक्ष आहेत. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा आहे. जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नवा डाव टाकला आहे. यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर पक्षानं नवी खेळी केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबईत 22 जागांवर तयारी

उद्धव ठाकरेंसाठी मुंबई अतिशय महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेवर त्यांची अनेक वर्ष सत्ता होती. त्याचबरोबर कोणत्याही निवडणुकीत मुंबईतील जास्तीत जास्त जागा लढवण्याची त्यांची आग्रही भूमिका असते. लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षानं मुंबईतील 6 पैकी 4 जागा लढल्या होत्या. त्यापैकी 3 ठिकाणी पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते.

लोकसभेतील यशानंतर पक्षानं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षानं 22 मतदारसंघात लढण्याची तयारी सुरु केली असून संभाव्य उमेदवारांची यादी देखील तयार केली आहे. ही यादी 'NDTV मराठी' ला मिळालीय. 

( नक्की वाचा : 'विदर्भ फॅक्टर' निर्णायक, माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांच्या भवितव्याचा होणार फैसला )
 

महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरु असतानाच ही यादी तयार करत उद्धव ठाकरेंनी नव्या दबावतंत्राचा वापर केल्याचं मानलं जात आहे. यामधील काही जागांवर लढण्यासाठी काँग्रेसही आग्रही आहे. त्यामुळे  महाविकास आघाडीमध्ये या यादीवरुन काय राजकारण रंगणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतील संभाव्य उमदेवार

1. विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी : मागाठणे

2. विनोद घोसाळकर : दहिसर 

 3 सुनिल प्रभू : दिंडोशी 

4. अमोल किर्तीकर/ बाळा नर/ शैलेश परब : जोगेश्वरी 

5. ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम 

6. राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा 

7. वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व

8. विशाखा राऊत/ महेश सावंत : दादर-माहिम 

9. अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी 

10. आदित्य ठाकरे : वरळी 

11. किशोरी पेडणेकर/ जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा 

12.  ईश्वर तायडे : चांदीवली 

13. अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर : चेंबूर

14. रमेश कोरगांवकर : भांडुप 

15. सुनिल राऊत : विक्रोळी 

16. संजय पोतनीस : कलिना

17. विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर 

18.  सुरेश पाटील : घाटकोपर 

19. प्रविणा मोरजकर : कुर्ला 

20. निरव बारोट : चारकोप 

21. समीर देसाई : गोरेगाव 

22. श्रद्धा जाधव : वडाळा