डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठे खिंडार; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात

आदित्य ठाकरे डोंबिवलीत आलेले असतानाच दुसरीकडे महायुतीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरातून डोंबिवलीतल्या ठाकरे गटाचा हा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
आदित्य ठाकरे आज ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारानिमित्त डोंबिवलीत आले होते. (Twitter - Aditya Thackeray)

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या डोंबिवली दौऱ्यानंतर अवघ्या काही तासातच डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख महिला जिल्हा संघटक, युवती सेना पदाधिकारी यांच्यासह बडे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे डोंबिवलीत आलेले असतानाच दुसरीकडे महायुतीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरातून डोंबिवलीतल्या ठाकरे गटाचा हा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये उबाठा गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, युवती सेना जिल्हाधिकारी लीना शिर्के, उपशहर संघटक किरण मोंडकर, कल्याण पूर्व विधानसभा संघटक राधिका गुप्ते, उपशहर संघटक राजेंद्र नांदोस्कर, विभाग प्रमुख श्याम चौगुले, सुधीर पवार, शिवराम हळदणकर, उपविभाग प्रमुख नरेंद्र खाडे, सतीश कुलकर्णी, प्रशांत शिंदे, प्रसाद चव्हाण, शाखाप्रमुख विष्णू पवार, मयूर जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

(नक्की वाचा- दक्षिण मुंबईतून भाजपची माघार, शिवसेना आमदाराला उमेदवारी जाहीर)

या सर्वांचा आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. 

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटात प्रचंड नाराजी पाहायला मिळत होती. आज एकीकडे वैशाली दरेकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी असणाऱ्या जिल्हा महिला संघटक कविता गावंड, शहर शाखाप्रमुख विवेक खामकर यांच्यासह जवळपास 100 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कविता गावंड यांनी याबाबत एनडीटीव्ही मराठीशी बोलताना माहिती दिली. 

Advertisement

(नक्की वाचा - 'होय, मी भटकती आत्मा...', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' वक्तव्याला शरद पवारांचं प्रत्युत्तर)

दरम्यान कविता गावंड यांना देखील महाविकास आघाडीची उमेदवारी हवी होती. यासाठी त्यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी साधी भेट देखील घेतली नसल्याचीखंत कविता गावंड यांनी व्यक्त केली.