पाचोरा मतदारसंघात भावा विरुद्ध बहीण रिंगणात, लाडक्या बहीणीनं असं का केलं?

काही ठिकाण काका विरुद्ध पुतण्या, भावा विरुद्ध भाऊ, मुली विरुद्ध बाप अशा लढती रंगत आहेत. त्या पैकीच एक लढत होत आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

कोणत्या मतदार संघात कशा लढती असणार याचे चित्र आता हळुहळु स्पष्ट होत आहे. काही ठिकाण काका विरुद्ध पुतण्या, भावा विरुद्ध भाऊ, मुली विरुद्ध बाप अशा लढती रंगत आहेत. त्या पैकीच एक लढत होत आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील. या मतदार संघात भावा विरुद्ध लाडकी बहीण निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही शिवसैनिक आहे. मात्र आता एक जण शिंदे सेनाचा तर दुसरा ठाकरे सेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे या बहीण भावातील ही लढत लढवेधी ठरणार आहे. त्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघात किशोर पाटील हे विद्यमान आमदार आहेत. ते शिवसेनेकडून आमदार झाले होते. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर किशोर पाटील यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. शिंदेंनी त्यांना पुन्हा एकदा पाचोरा विधानसभा मतदार संघातून संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या बहीण वैशाली सुर्यवंशी यांना मैदानात उतरवले आहे. या निमित्ताने वैशाली सुर्यवंशी यांनी आपला भाऊ विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे.   

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाची दुसरी यादी आली, काँग्रेसने दावा केलेल्या 'त्या' जागेवरही उमेदवाराची घोषणा

भाऊ रणांगण सोडून गेल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागत आहे असे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे हे आपल्यालाच काय तर मतदारांनाही पटलेले नाही असं त्या म्हणाल्या. वैशाली सूर्यवंशी यांचे वडील शिवसेनेचे दिवंगत नेते आर ओ तात्या पाटील हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांचा राजकीय वारसा किशोर पाटील हे सांगू शकत नाहीत असा हल्लाबोलही वैशाली सूर्यवंशी यांनी केला आहे. किशोर पाटील यांनी विचारांचा व तत्वांचा वारसा सोडून दुसरा विचार केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?

भावा विरुद्ध निवडणुकीत उतरण्याची वेळ भावानेच आणली असल्याचं ही त्या म्हणाल्या. ही निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर किशोर पाटील हे सलग दोन वेळा विजयी झाले आहेत. यावेळी हॅटट्रीक करण्याची त्यांना संधी आहे. पण त्याच्या विरोधात बहीणच उभी राहील्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार हे मात्र नक्की आहे.